शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस सुस्त कसे? : सामाजिक दबाव झुगारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:01 IST

५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस्थाची भूमिका घेतली.

ठळक मुद्देबयाण १० जणांचे; मृत्यूचे कारण कळेना

दर्यापूर : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूला आठ दिवस उलटत असताना स्थानिक पोलीस अंधारात चाचपडत आहेत. गोदावरी हॉस्पिटलमधील सीसीटिव्ही फुटेज, दहा जणांचे बयाण आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतरही डॉ. भट्टड यांची आत्महत्या की घातपात? यापैकी कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा पोहोचू शकली नाही. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे सोपवावा, अशी आग्रही मागणी होत असतानाही स्थानिक पोलीस त्यांच्या मृत्यूची गूढ उकलण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस्थाची भूमिका घेतली. मात्र, सामाजिक व राजकीय दबाव आल्याने पोलिसांनी शवविच्छेदनासाठी होकार मिळविला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांचा आहे. त्याला वैद्यकीय अहवालाची जोड देण्यात आली. मात्र, आठवड्यानंतरही डॉ. भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूची चर्चा थांबलेली नाही. हजारोंचे प्राण वाचविणारे डॉक्टर आत्महत्या करूच शकत नाही, असा विश्वास दर्यापूरकरांना आहे. त्यामुळे आता तर घातपाताची शक्यता बोलून दाखविली जात आहे. मात्र, पोलीस आत्महत्येवरच थांबली असून योग्य दिशेने कुठलाही तपास करण्यात आलेला नाही. अनेक मुद्दे घातपाताच्या शंकेला खतपाणी घालणारे असताना स्थानिक पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा आत्महत्येपुरती मर्यादित केली आहे. हे संपूर्ण प्रकरण आत्महत्येपुरते मर्यादित राहावे, यासाठी अनेकांचे खिसे गरम करण्यात आल्याची चर्चा आहे. असे असताना पोलीस इतर आकस्मिक मृत्यूप्रकरणासमान या हायप्रोफाईल प्रकरणाला ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. हाती आलेले फुटेज, त्यातील वास्तव पाहता याचा तपास घातपाताचा दिशेने व्हावा, अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान व्हिसेरा अहवाल केव्हा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.डॉक्टरांवर ताण कशाचा?डॉ. भट्टड यांनी आत्महत्या केली असेल, असा पोलिसांना दावा खरा मानल्यास त्यांनी आत्महत्या का केली असावी, याबाबत पोलीस साधा प्राथमिक निष्कर्षही काढू शकले नाहीत. केवळ सामाजिक बदनामी होऊ नये, यासाठी आपण हृद्याघाताचा बनाव केला, या डॉक्टरपत्नीच्या बयानावर विश्वास ठेऊन पोलिसांनी घातपाताची शक्यताच पुर्णपणे नाकारली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू