शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक नोंद झाल्यानंतर नाव यादीतून गायब होतेच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:49 IST

शेतकऱ्यांचा सवाल : सात-बारा नोंदी ग्राह्य धरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षीच्या खरीप हंगामात मुदतीत ई-पीक पाहणी केली. पिकांची सातबाऱ्यावर नोंददेखील आहे; मात्र जमाबंदी विभागाद्वारा कृषी विभागाला प्राप्त यादीमध्ये नाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे सात बाऱ्यावरील पिकांची नोंद ग्राह्य धरून संबंधित शेतकऱ्याला कपाशी व सोयाबीनसाठी शासन मदत देण्याची मागणी होत आहे.

राज्य शासनाने २९ जुलैच्या जीआरनुसार गतवर्षी ई-पीक पाहणीवर नोंद केलेल्या सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या जमाबंदी विभागाने गतवर्षीच्या खरीप हंगामात ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पीकनिहाय याद्या कृषी विभागाला पुरविल्या वः या याद्या आता ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. यात काही शेतकऱ्यांची नावे गायब असल्याचे निदर्शनास आले.

प्रत्यक्षात शेतात जाऊन जमाबंदी विभागाचे मोबाइल अॅपद्वारे संबंधित पिकाचा ऑनलाइन पेरा नोंदविला होता. आता जमाबंदी विभागाकडून याद्या प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये नाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

कृषी विभागाला अधिकार नाहीत शासनादेशात शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट करण्याची कोणतीही तरतूद सध्या नाही. त्यामुळे जमाबंदी विभागाद्वारा प्राप्त याद्यांमधील शेतकऱ्यांची कागदपत्रे कृषी सहायकांमार्फत जमा करण्यात येऊन या माहितीची डेटा एंट्री करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पीकपेरा नोंदविल्यानंतर यादीत नाव नसल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीAmravatiअमरावती