लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाईन फॉर्म भरणेच कठीण झाले आहे. फॉर्ममध्ये असणाºया जाचक अटी पूर्ण करताना शेतकºयांचे नाकीनऊ आले आहे. ज्या शेतकºयांचे मृत्यू झाले आहे अशा लाभार्थ्यांच्या वारसदारांसमोर वारसा प्रमाणपत्र तयार करण्याचे फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे.शासनाने आॅनलाईन फॉर्म भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे. फॉर्ममध्ये सर्वात पहिले शेतकºयांचा आधार नंबर व अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकही द्यावा लागत आहे. त्यामुळे या अटींची पूर्तता करणे अनेकांना तारेवरची कसरत ठरत आहे. त्याचप्रमाणे अशिक्षित आदिवासी शेतकºयांसाठी तर हे फॉर्म भरणे म्हणजे एक दिवास्वप्नच ठरणार की काय, असा सवाल निर्माण झाला आहे. यातील किचकट अटींमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.एसडीओंच्या सक्रिय सहभागातून कामाला गतीआॅनलाईन कर्जमाफी फॉर्म भरताना येत असलेल्या समस्यांबाबत एसडीओ विजय राठोड यांनी प्रत्येक ई-सेवा केंद्रांना भेट दिली. त्यांनी स्वत: काही ठिकाणी बसून फॉर्म भरून देऊन प्रक्रियेची माहिती संचालकांना दिली. त्यामुळे फॉर्म भरताना येणाºया अनेक अडचणींचा त्यांनी जागेवरच निपटारा करून दिलेत. याचा फायदा फॉर्म भरताना होत असलेला विलंब दूर करण्यात आला आहे.सर्व्हरला हँगचा त्रासफॉर्म भरताना अनेकवेळा सर्व्हर हँग होत आहे. त्यामुळे फॉर्म भरण्यात विलंब होत आहे. अन्यथा ५ ते ७ मिनिटांत फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. माझ्या केंद्रात आतापर्यंत ८० फॉर्म गेल्या दोन दिवसात भरले गेले आहेत, असे धारणीचे महा. ई सेवा, संचालक सुनील लखपती म्हणाले.योजना बँकेतूनच राबवावीशेतकºयांना कर्जमाफी दिली. परंतु होणारा त्रास जीवघेणा ठरत असल्याने सर्व माहिती बँकेकडे असल्याने ही योजना बँकेतूनच राबविण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. यामुळे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होऊन शेतकºयांना दिलासा मिळेल.
मृतांच्या वारसांनी अर्ज भरावे तरी कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:15 IST
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे आॅनलाईन फॉर्म भरणेच कठीण झाले आहे.
मृतांच्या वारसांनी अर्ज भरावे तरी कसे ?
ठळक मुद्देऐतिहासिक अडचणी : वारसा प्रकरणे 'डेडलाईन'पर्यंत होणे अशक्यच