शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

उतरत्या वयात कसे व्हायचे ‘स्मार्ट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:48 IST

आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची.

ठळक मुद्देटेबल एक अन् लाभार्थी शंभर : शासनाच्या बडग्यामुळे असुविधा वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. एकच टेबल असल्यामुळे रांगेत तिष्ठत बसण्यापासून सुटका नाही आणि काही चुकलेच, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हावे लागते. ६५ वर्षांवरील नागरिकांची ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत पास अर्थात स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती आगारात होत असलेली आबाळ दुर्दैवी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी सोमवारी रांगेत लागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली.‘लोकमत’ची चमू सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता आगाराच्या पास वितरण विभागात दाखल झाली, त्यावेळी अमरावतीसह टाकरखेडा संभू, साऊर, रामा, आसरा, भातकुली, देवरा देवरी, पोहरा, जळका शहापूर, माहुली आदी भागातून आलेले सुमारे शंभरावर ज्येष्ठ नागरिक रांगेत लागले होते. एक-एक क्रमांक सरकायला किमान २० मिनिटे ते अर्धा तास लागत असल्याचे पाहून त्यांचे धैर्य सुटले होते. काही जण सकाळी ७ च्या एसटीने आले होते, तर काही जणांनी त्यासाठी अमरावतीत मुक्काम केला होता. दुपारी पाऊण वाजेपर्यंत म्हणजे पाच तासांनंतरही अवघ्या ३० व्यक्तींची कागदपत्रे घेण्यात आले होते. दरम्यान, रमेश अंबुलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलचा एसएमएस डेटा डिलीट करण्याच्या सूचना दिल्या. हे काय नवीन, असे वृद्धांना होऊन गेले. अखेरीस पास काढण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केली.अशी आहे प्रक्रिया५ मार्च २०१९ पासून स्मार्ट कार्डसाठी कागदपत्रे घेण्यास सुरूवात झाली. शासनाने सांगितलेली आधार कार्ड, इलेक्शन कार्ड व मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. याआधारे संगणकात नोंदणी झाल्यानंतर ओटीपी क्रमांक मिळतो. त्या क्रमांकाची नोंद झाली, की प्रक्रिया पूर्ण. त्यानंतर पोस्टाने घरपोच स्मार्ट कार्ड मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.मुदतवाढीचा कुणालाच नाही पत्तामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ जुलै रोजी तातडीचे पत्र काढून ३१ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात मुदतवाढ दिली आहे. तथापि, याबाबत भिंतीवरील पत्रकाशिवाय कुठेच जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. याबाबत विविध माध्यमांद्वारे प्रसाराची गरज आहे.नवीन मोबाईलच आणलाआसरा येथील राजाराम डोंगरे हे रविवारी स्मार्ट कार्डसंबंधी दस्तावेज देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडील मोबाइल कुणाचा, अशी विचारणा झाली, तसेच रांगेत असलेल्याच्या मालकीचा मोबाइल असायला हवा, असे सांगण्यात आले. परिणामी नवाकोरा मोबाइल विकत घेऊन ते सोमवारी रांगेत दाखल झाले.एकच टेबलज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्डसंबंधी कागदपत्रांसाठी रोज मोठी रांग लागत असून, कागदपत्रे स्वीकारण्यासाठी एकच टेबल दिल्याची तक्रार टाकरखेडा मोरे येथील ओंकार मोरे यांनी केली. आसार येथील प्रमोद देशमुख यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, शासनाकडून तसे निर्देश असून, टेबल वाढविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे वाहतूक नियंत्रक जयंत मुळे म्हणाले.दोन स्नॅपनंतर फिरायला लागला पंखामध्यवर्ती बस स्थानकात पास वितरण खिडकीकडून अनेक वर्षांपासून फलक लागलेले असल्याने बाहेरची हवी फार कमी आत येते. उकाड्यामुळे अंग चिकट झालेल्या वयोवृद्धांनी पंखा लावण्यासाठी आधीच विनवणी केली होती. मात्र, ‘लोकमत’च्या कॅमेºयाचे स्नॅप पडण्यापूर्वी त्यांच्या विनंतीला मान मिळाला नाही. दोन स्नॅपनंतर मात्र पंखा फिरायला लागला.आजी-आजोबा त्रस्तबीबीजान (टाकरखेडा संभू), निर्मला चेंडकापुरे, रमाबाई चव्हाण, शे. हसन शे. महबूब (अमरावती), शंकरराव नांदणे, सरूबाई नांदणे (देवरा), यशोदा दहाट, सुमन टवरे, (जळका शहापूर), इंदूबाई सोनटक्के (यावली), श्रीराम गायकवाड, पुनाबाई गायकवाड (साऊर), पंचफुला सोनोने (पोहरा)येथून आलेले बहुतांश ज्येष्ठ नागरिक रांगेत त्रस्त झाले होते.प्रिंटर बंद पडल्याने प्रक्रिया खोळंबली. एरवी पाच-सात मिनिटांत एक अर्ज घेतला जातो. मात्र, काही जण मोबाइलऐवजी चिठ्ठी घेऊन येतात. त्यांचा नंबर कुठून घ्यावा? एक ते दीड सेकंदच ओटीपी अस्तित्वात राहतो. स्मार्ट कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अवधी आहे.- रमेश अंबुलकर,वाहतूक नियंत्रक