शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 12:43 IST

दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती.

चांदूर रेल्वे (अमरावती) : चुकीने लागलेला मोबाईलचा अलार्म मध्यरात्री दीड वाजता वाजला अन् कुटुंबातील एक पाहुणे उठले. त्यांना घराची भिंत पडताना दिसली. त्यांनी वेळीच सर्वांना बाहेर काढले. काही वेळातच ही खोली पूर्णत: ढासळली. तालुक्यातील कवठा कडू येथे हा थरार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सारंगधर श्यामराव लांजेवार व त्यांची पत्नी यांचे वास्तव्य असलेले दोन खोल्यांचे टीन-मातीचे घर आहे. लग्न झालेली २५ वर्षीय मुलगी व जावई हे पाच महिन्यांच्या मुलीसह त्यांच्याकडे आले होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती.

अशातच मध्यरात्री दीडच्या सुमारास जावयाच्या मोबाइलचा चुकीने लागलेला अलार्म वाजला. त्यांची झोप उघडली व अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंत थोडी-थोडी ढासळत आहे. त्यांनी सर्वांना हाक देऊन उठवले व घराबाहेर काढले. यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते, ती खोली पूर्णतः जमीनदोस्त झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले. तलाठ्यांनी बुधवारी पंचनामा केला.

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊसAmravatiअमरावती