लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युवा स्वाभिमानी पार्टीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात माजी सैनिकांच्या विधवा पत्नीचा सन्मान करून त्यांना आर्थिक मदतीचे हात देण्यात आला.युवा स्वाभिमानीच्या परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मोनू सुनील भलावी, कविता प्रभुदास छापाने, सुरेखा नंदराम भुजबळ, कुसूम रामराव घाटोळ, निरा सुभाष शिरभाते यांना अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते सन्मान करून आर्थिक मदत देण्यात आली. अमरावतीमधील नवाथेनगरात पार पडलेल्या दहिहंडी कार्यक्रमात सुनंदा दादाराव घोडेस्वार, अनिता दिलीप बनसोड, देविका बळवंत थोरात, रत्नप्रभा श्रीवंत बनसोड, चंद्रकला काशिनाथ डहाके, प्रतिभा महादेव राहाटे, कमल निरंजन रायबोले, नलीनी गणेश भाकरे,सरला अनिल लोखंडे, बेबी श्रीकृष्ण गावंडे यांचा सन्मान व आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी बहादूर माजी सैनिक संघटनेचे संस्थापक बी.एस. राय, प्रदीप गायकवाड, हरिहर भातकुले, साबुलाल धांडे, हरिदास वानखडे, रमेश इंगळे, शिरसाठ, श्रीकृष्ण सोनोने, जी.बी.चव्हाण, विनायक इंगळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:06 IST