शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:14 IST

मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अमरावती : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शाश्वत शाळेतील एकूण ४० पैकी १० विद्यार्थी पुढील पातळीसाठी निवडले गेले, तर अदिती व-हाडे ही प्रथम क्रमांकाने निवडली गेली. पूर्ण राज्यभरात होमी भाभा परीक्षेचा निकाल सात टक्के लागलेला असतानाच राज्यातील शाश्वत या एकमेव शाळेचा निकाल २५ टक्के लागला आहे. अनुष्का पोटोडे, मृण्मयी जोशी, मधुर लिखमणी, सुबोध कानबाले, श्रेया साकला, मेघना बजाज, प्लक्षा पांडे, राज आचलिया, आदित्य मामर्डे हे विद्यार्थी पुढील पातळीसाठी निवडले गेले आहेत.या परीक्षेसाठी तयारी करताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही पुस्तकाचा वापर केला नाही किंवा घोकंपट्टी केली नाही. परीक्षेची तयारी करताना शिक्षकांनी खेळाद्वारे विज्ञान शिकविले. नुकतेच शिक्षण नाही तर विज्ञान कसे आत्मसात करावे, यासाठी हा उपक्रम होता. म्हणून या निकालामुळे सगळेजण शाश्वत शिक्षण पद्धतीची दखल घेत आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशात वैशाली ठाकूर, हिमानी राठी व सरिता खत्री, अनुप्रिया मंडकमारे यांचे मार्गदर्शन लाभले. शाश्वतच्या संस्थापिका अमृता गायगोले यांच्या मार्गदर्शनासोबतच नारायणा आय.आय.टी. अकॅडमी दिल्ली मधील तज्ज्ञ शिक्षक आलोक कुमार, टाटा इन्स्टिट्युटचे माजी शास्त्रज्ञ डॉ. आनंद घैसास याशिवाय संजय पांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करावी या हेतूने शाश्वत शाळेने स्पर्धा परीक्षा विभाग सुरू केला आहे. यात इयत्ता पाचवी व आठवीसाठी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता सहावी व नववीसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, इयत्ता दहावीसाठी एनएसटीएसई परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. यात कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. भारतातील वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी ध्येयपूर्तीसाठी या उपक्रमात जुळलेली आहेत तसेच पालकसुद्धा शिक्षणक्षेत्रातील आमूलाग्र बदलाची सुरुवात म्हणून या उपक्रमाकडे पाहत आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा