पालकमंत्री : पोहरा येथे शेळी-मेंढी पालन, संगोपन केंद्र स्थापनअमरावती : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा ४ मार्च २०१५ पासून अमलात आला आहे. आपल्या देशात गोवंश संगोपन व संवर्धनाची प्राचिन संस्कृती आहे. पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय म्हणून गाईचे संगोपन व संवर्धन करून समृध्द व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.नांदुरा (बु.) येथे गोकूलम गोरक्षण संस्था व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित मानद पशुकल्याण अधिकारी मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, पशुसंवर्धन आयुक्त, कांतीलाल उमप, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष मोतिसिंह मोहता, प्रादेशिक सहआयुक्त एस.पी.चव्हाण, किरण पटवर्धन, गोकुलम गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत मुरके, मानद ट्रस्टी राधेश्याम बहादुरे, व्याख्येते श्रीकांत घरोटे आदी उपस्थित होते. गोवंश हत्या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा स्थापित करण्यात आला आहे. गाईचे दूध आरोग्यवर्धकगाईच्या दुधापासून होणारे सर्व पदार्थ हे गुणकारी व आरोग्यवर्धक आहेत. गाईच्या गोमूत्र अर्काच्या वापरामुळे झाडे व रोपांमधील रोग नाहीसा होतो. ग्रामीण भागात ई-क्लास जमिनीवर गाईंना व दुधाळ जनावरांना चरण्यासाठी चाराडेपो तयार करण्यात आला आहे. याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. शेतक्यांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी गाईच्या दुधापासून तयार होणारे पदार्थ निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रजातीच्या दुधाळ गाईंची संख्या वाढविण्यासाठी संशोधकांचे मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करावे. महिलांना प्रोत्साहित करुन बचतगटाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार करण्यासाठी लघु उद्योग स्थापित करावे, असे पालकमंत्री म्हणाले.
गोवंश संवर्धनामुळे घरोघरी समृद्धी
By admin | Updated: August 27, 2016 00:05 IST