शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

जीवन जगण्यासाठी त्याची अशीही संघर्षमय वाटचाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:01 IST

विजय वासुदेव लोखंडे (४२) या शेतमजुराची ही व्यथा आहे. विजय हा २ जानेवारी २०२० रोजी चारचाकी वाहनाने आसेगावनजीक त्याच्या दुचाकीला धडक दिली. मदत करतो, पण पोलीस ठाण्यात तक्रार करू नको, असे म्हटल्याने विजयने पोलिसांत तक्रार दिली नाही. वाहनचालकाने विजयला पाच हजार रुपये दिले.  त्यानंतर भेटलेही नाही. विजयला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर उजव्या पायाचे ऑपरेशन केले.

ठळक मुद्देदुचाकी अपघातानंतर आखूड झाला पाय

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करून संसाराचा गाढा ओढणाऱ्या एका शेतमजुराला चारचाकीने उडविले. शस्त्रकियेनंतर एका पायाची लांबी सात ते आठ इंचाने  कमी झाली. अपघातात जीव वाचला मात्र चालता येत नाही. कमरेतील वेदनेमुळे झोपताही येत नाही, अशी अवस्था जळका पटाचे येथील या मजुराची झाली आहे. कोरोनाकाळात  कुटुंबासाठी त्याचा संघर्ष सुरू आहे. विजय वासुदेव लोखंडे (४२) या शेतमजुराची ही व्यथा आहे. विजय हा २ जानेवारी २०२० रोजी चारचाकी वाहनाने आसेगावनजीक त्याच्या दुचाकीला धडक दिली. मदत करतो, पण पोलीस ठाण्यात तक्रार करू नको, असे म्हटल्याने विजयने पोलिसांत तक्रार दिली नाही. वाहनचालकाने विजयला पाच हजार रुपये दिले.  त्यानंतर भेटलेही नाही. विजयला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केल्यानंतर उजव्या पायाचे ऑपरेशन केले. यात मांडीतील हाड न जुळल्यामुळे उजवा पाय सात ते आठ इंच कमी झाला. तदनंतर कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले. आपल्या मांडीचे ऑपरेशन होईल व पुन्हा आपल्याला चालता येईल, या आशेने दोन ते तीन वेळा नागपूर गाठले. मात्र, कोरोनामुळे नागपुरातील  सर्जरी वाॅर्ड बंद करण्यात आला आहे. 

सामाजिक संघटनानी घ्यावा पुढाकारएकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, दुसरीकडे घरातील कर्ता पुरुषाचा  पाय निकामी झाल्याने तो बिछान्यावर आहे. त्यामुळे विजयची पत्नी चिंतेत आहे. धामणगाव गॅस डोमेस्टिक अप्लायसन्सचे संचालक  निखिल भंसाली यांच्यापर्यंत ही बाब पोहोचताच स्वत: मदत करीत इतर सामाजिक संस्थेतर्फे मदत व्हावी म्हणून विजयची व्यथा ऑनलाइन फेसबूक लाईव्ह केली.  दुबईतील एका व्यक्तीने पाच हजार रुपये विजयच्या बँक खात्यात टाकले.  घरात अठराविश्वे दारिद्ऱ्य असलेल्या विजयचा संघर्ष कमी व्हावा, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात