शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चल, तू 'राम' बचा, मैं राखूं 'रहीम'.. अमरावतीत धार्मिक सौहार्दाचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 11:20 IST

धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत.

गजानान चोपडेलोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : तीन दिवसांपूर्वी अमरावतीकरांनी दंगल अनुभवली. अनेक दुकानांची तोडफोड झाली तर, काही भागात जाळपोळही झाली. शहराला छावणीचे रुप आले. एसआरपीएफच्या कंपन्या, सशस्त्र पोलीस दल आणि स्मशानशांतता हे चित्र सध्या आहे. या नकारात्मक वातावरणातही धार्मिक सौहार्द राखत दोन्ही समाजाती सुजाण मंडळींनी मानवतेची शान कायम ठेवली आहे. मुस्लीमबहुल भागातील चार मंदिरांची सुरक्षा मुस्लीम बांधव करीत आहेत. तर, हिंदुबहुल भागातील मशिदींचे संरक्षण हिंदू बांधव करीत आहेत.

दंगलग्रस्त भागाचा 'लोकमत'च्या प्रतिनिधींनी कानोसा घेतला. दोन्ही धर्मांचे बांधव जेव्हा एकमेकांच्या प्रार्थनास्थळांचे माथेफिरुंपासून संरक्षण करताना दिसले, तेव्हा, चल तू 'राम' बचा, मैं राखूं 'रहीम' या शब्दांची आपसूकच प्रचीती आली.

मशीद आणि दर्गा सुरक्षित

  • खोलापुरी गेट मार्गावरील हिंदुबहुल दगडी पूल भागातील दर्गा, जुना सराफा बाजारातील मशीद आणि गडगेश्वर भागातील दर्गा मुस्लीम बांधवांच्या या धार्मीक स्थळांचे संरक्षण हिंदू बांधवांनी केल्यामुळे या वस्तूंना धक्काही लागला नाही.
  • एकीकडे काही विघ्नसंतोषींकडून अराजकता पसरविण्याचा प्रयत्न होत असताना हे शांततादूत एकमेकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी धडपडत आहेत.

'मंदिर भी हमारा, मस्जिद भी हमारीही'

  • सेवकवाडीत दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. तणाव होता तेव्हा नुरुद्दीन टीआयआय यांच्यासह अनेक मुस्लीम बांधव मंदिराच्या संरक्षणार्थ धावून आले.
  • निर्मला जोशी म्हणाल्या, 'परिसरातील मुस्लीम बांधवांनी आम्हाला धीर दिला. तुम्हाला व मंदिराला धक्काही लागू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.'
  • मंदिराजवळ एका मुस्लीम महिलेची भेट झाली. त्या म्हणाल्या, 'मंदिर भी हमारा है और मस्जिद भी हमारीही है.' प्राचीन शिवमंदिराचे संरक्षण करण्यासाठी २५ ते ३० मुस्लिमांची फौज रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत. 
टॅग्स :SocialसामाजिकTripuraत्रिपुराHinduहिंदूMuslimमुस्लीम