शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ; विधानसभा निवडणुकीत सहा टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:26 IST

Amravati : गतवेळ पेक्षा वाढली टक्केवारी ; शांततेत विनातक्रार पार पडले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली आहे. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे सहा टक्के मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच संपूर्ण आठही विधानसभा मतदारसंघात शांततेत विनातक्रार मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६०.५७ टक्के एवढी होती. यात विक्रमी ६ टक्क्यांनी वाढ होत यावर्षी ६६.४० टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही मोठी वाढ आहे. त्यासोबतच जिल्ह्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे.

मतदानासाठी प्रशासनाने केलेली तयारी, जनजागृती आणि नागरिकांच्या उत्साही सहभागाने मतदानाचा टक्का सुधारला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत कोणतीही तक्रार आलेली नाही. प्रामुख्याने मतदारयादीमध्ये निवडणुकीपूर्वी १ लाखाहून अधिक नवीन मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. मतदानात नागरिकांनी चांगला सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदारांचे आभार मानले आहे.

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ८ लाख ९१ हजार ३ पुरुष, ७ लाख ९९ हजार ८४७ महिला आणि तृतीयपंथी ३० अशा एकूण १६ लाख ९० हजार ८८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.४० आहे. 

धामणगांव रेल्वे एकुण मतदान - २२१७१९ पुरुष - ११७२२२ महिला - १०४४९७ इतर - 00 टक्केवारी - ६९.७५

अमरावती एकुण मतदान - २११६०६ पुरुष - ११०९९७महिला - १००५९९इतर - १०टक्केवारी - ५६.५१

बडनेराएकुण मतदान - २०९८०९पुरुष - १०८४६५महिला - १०१३३९इतर - १५टक्केवारी - ५७.६७

मेळघाटएकुण मतदान - २२०९१३पुरुष - ११४५२३ महिला - १०६३८६इतर - ०४टक्केवारी - ७३.१४

तिवसाएकुण मतदान - २०१४१२पुरुष - १०७४५८महिला - ९३९५४इतर - 00टक्केवारी - ६७.९३

दर्यापूरएकुण मतदान - २०६१८८पुरुष - ११०६८८महिला - ९५५००इतर - 00टक्केवारी - ६६.८५

अचलपूरएकुण मतदान - २१०६१४पुरुष - ११२१३१महिला - ९८४८२इतर - ०१टक्केवारी - ७२.०७

मोर्शीएकुण मतदान - २०८६१९पुरुष - १०९५१९महिला - ९९१००इतर - 00टक्केवारी - ७१.६६

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AmravatiअमरावतीVotingमतदान