शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

By admin | Updated: July 28, 2016 00:06 IST

जिल्ह्यात २४ तासात अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यांसह ९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

 ५५ घरांची पडझड : सरासरी ४२.६ मि.मी. पाऊस अमरावती : जिल्ह्यात २४ तासात अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यांसह ९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात ५५ घरांची पडझड झालेली आहे. एका दिवसात धरणांच्या सरासरी साठ्यात ७ दलघमीने वाढ झाली. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक (येवा) अधिक असल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी ४२.६ मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक ९२.६ मि.मी. पाऊस चांदूररेल्वे व ९२.४ मि. मी.पाऊस अचलपूर तालुक्यात ८२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस ६५ मि. मी. पेक्षा जास्त असल्याने अतिवृष्टी समजण्यात येतो. उर्वरित तालुक्यांमध्ये अमरावती ६० मि. मी. भातकुली ३८.६, नांदगांव खंडेश्वर ४८.२, धामणगांव ५२, तिवसा १५, मोर्शी २३.३, वरुड २७, चांदूरबाजार १२, दर्यापूर ६०.६, अंजनगांव सुर्जी १०, धारणी २३ व चिखलदरा तालुक्यात ४६ मि. मी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात १ जून ते २७ जुलै दरम्यान पावसाची ३८६.८ मि. मी पावसाची सरासरी अपेक्षित असताना ६०५.५ मि. मी. पाऊस पडला आहे. ही १५६ टक्केवारी आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८५९.६ मि. मी. पाऊस धारणी तालुक्यात पडला. अमरावती तालुक्यात ५२१.७ मि. मी, भातकुली ४९६.४, नांदगांव ५१४.७, चांदूररेल्वे ५७८.३, धामणगांव ५६३, तिवसा ६२३, मोर्शी, ७४१.२, वरुड ४७६.२, अचलपूर ६४१.९, चांदूरबाजार ५६१.२, दयापूर ६२३.९, अंजनगांव सुर्जी ५०१.८ व चिखलदरा तालुक्यात ७७४.२ मि.मी. पाउस पडला आहे. येत्या २४ तासात जिल्ह्यासह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूर विमानतळाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या १० दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे पिकाच्या बरोबरीने तण वाढले आहे. तसेच पिकांवर किड व रोंगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. पीके पिवळी पडू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)८२ जलप्रकल्पांमध्ये ६९.२० टक्के साठा जिल्ह्यात उर्ध्व वर्धा या मुख्य व शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सापन हे मध्यम व इतर ७७ लघुप्रकल्पात ६९.२० टक्के आजचा जलसाठा आहे. या सर्व प्रकल्पाची संकलीत पातळी ९०५.८५ दलघमी असताना सद्य:स्थितीत ६२६.३७ दलघमी संकलीत पातळी ९०५.८५ दलघमी जलसाठा आहे. मागच्या वर्षी याच दिनांकाला ४३८.१० दलघमी साठा होता. ही ४८.४० टक्केवारी होती. या मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात २४ तासात ९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये धारणी तालुक्यातील हरिसाल मंडळात ६५.२ मि.मी., सावलीखेडा ८०.२, दर्यापूर तालुक्यात वडनेर गंगाई ७६.२, थिलोरी ८५.१, अचलपूर तालुक्यात अचलपूर८२.४, परतवाडा १०९.२, तिवसा तालुक्यात वऱ्हा ६६.६,चांदूर रेल्वे ९८.६ मि.मी. पाऊस पडला आहे.दोन धरणांचे गेट उघडलेसद्य:स्थितीत पूर्णा व सापन या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आली आहे. तर उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडल्या जाणार आहे. पूर्णा प्रकल्पाची ३ दरवाजे १०.से.मी. ने उघडण्यात आले. येथे १३.४५ घमीप्रसे विसर्ग सुरु आहे. सापन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. येथे ८.७२ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग सुरु आहे.