शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

१७९ सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यास ‘सर्वोच्च’ नकार

By गणेश वासनिक | Updated: August 13, 2024 18:22 IST

Amravati : मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा निर्णय ‘जैसे थे’; १२ ऑगस्ट रोजी याचिकेवर निर्णय, वन विभागाचे मात्र ‘वेट ॲन्ड वॉच’

अमरावती : राज्य वनसेवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्ती झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) यांना पदोन्नती देताना प्रशिक्षण कालावधी ग्राह्य धरण्यात यावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दिला आहे.

मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पदावनत आरएफओंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यास सादर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. असे असताना वन विभागाकडून सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीसाठी कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. केवळ ‘वेट ॲन्ड वॉच’ अशी वरिष्ठांची भूमिका आहे.

सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्ट २०२४ रोजी याचिका क्रमांक ३५४२८/२०२४ अन्वये निलय भोगे विरुद्ध महाराष्ट्र राज्य यावर १२ ऑगस्ट रोजी सुनावणी करताना न्या. अभय एस. ओका, न्या. ऑगिस्टन जाॅर्ज मशिह यांनी सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १७९ सरळसेवा आरएफओंना पदोन्नती देणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र वन विभागातील वरिष्ठ आरएफओंच्या पदोन्नती फाइलकडे दुर्लक्ष करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरळसेवा आरएफओंना पदोन्नती मिळाली नाही तर पुन्हा नागपूर येथे वन बल भवनाच्या येरझारा मारण्यात आरएफओंना वेळ घालावा लागणार आहे. यासंदर्भात राजाच्या वन बलप्रमुख शोमिता बिश्वास यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

नागरी सेवा मंडळाची ९ ऑगस्ट रोजी बैठक, पण निर्णय नाहीच?यापूर्वी उच्च न्यायालयाने केवळ ३ याचिकाकर्त्यांसाठी संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेवर स्थगिती देणे शक्य नसल्याचे निरीक्षण नोंदवून याचिकाकर्ते यांच्यासाठी केवळ ३ जागा पुढील चार आठवड्यांसाठी स्थगित ठेवून पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनाला निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने वन विभागाने सरळसेवा आरएफओंना सहायक वनसंरक्षकांच्या रिक्त पदांवर पदोन्नती देण्यासाठी शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागरी सेवा मंडळाची बैठक घेतली. परंतु या बैठकीत १७९ आरएफओंच्या यादीवर कोणताही निर्णय झाला नाही.

सहायक वन संरक्षकांची पदे रिक्त, नियमित कामकाज प्रभावित‘मॅट’ न्यायालय, उच्च न्यायालय, आता सर्वोच्च न्यायालयानेही सरळसेवा आरएफओंच्या बढतीचा मार्ग सुकर केला आहे. आरएफओंच्या पदोन्नतीची यादीदेखील तयार आहे. मात्र वन खात्यातील वरिष्ठांची याबाबत उदासीनता दिसून येते. किंबहुना पदोन्नती कशी थांबेल, यासाठी पडद्यामागील जोरदार हालचाली होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तर सहायक वनसंरक्षकांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे वन विभागात नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती