लोकमत न्यूज नेटवर्कगुरूकुंज (मोझरी) : तामिळनाडू राज्यातील एका युवकाचे रेल्वे प्रवासात पाकीट व मोबाईल चोरी गेल्याने टी.सी.ने त्याला मध्येत उतरवून दिले. त्यामुळे ट्रकचालकाच्या मदतीने तो गुरुकुंज मोझरीत पोहचला. येथील मानवता फाऊंडेशनच्यावतीने त्याला तिकिटापूर्ते पैसे वर्गणीतून गोळा करून माणुस्कीचा परिचय दिला.तामिळनाडू येथील पांडियापूरम, थुतकुंडी येथील अरुण प्रसाथ (२४) हा युवक काही खासगी कामासाठी दिल्लीला गेला होता. वाटेतच त्याचे ट्रेनमध्ये पैशाचे पाकीट आणि मोबाईल चोरीला गेल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला. त्याला फक्त इंग्रजी आणि तामिळी भाषा अवगत होती. रेल्वेच्या टीसीने अर्ध्या प्रवासामध्ये भोपाळला उतरून दिले. तेथून तो ट्रक चालकांच्या मदतीने रविवारी गुरुकुंज मोझरीत पोहचला. मानवता फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांशी त्याची भेट झाली. सर्वांना हकीकत सांगितल्यानंतर सर्व सदस्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याचे अकाउंट तपासली. त्यानंतर त्याला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. तिकिटची सोय व्हावी, यासाठी तो गॅरेजमध्येसुद्धा काम करण्याची तयारी त्याने दाखविली होती. माणुस्कीचा परिचय देत मानवता फाऊंडेशनच्या सदस्यांनी वर्गणी गोळा करून तीन हजार रुपये त्याच्या झोळीत टाकले. मूळ गावी परतण्यासाठी ती रक्कम पुरेशी होती.मानवतेचा दिला परिचयतामिळनाडू येथील अरुण प्रसाथ हा युवक घरी पोहचण्यासाठी भटकंती करीत होता. कसे पोहचावे, काय करावे हे त्यालाही कळत नव्हते. प्रसंगी गॅरेजमध्ये काम करण्याची त्याची तयारी होती. मात्र, मानवता फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे करून मानवतेच्या परिचय दिला, हे विशेष.
परराज्यातील आर्थिक विवंचनेत सापडलेल्या युवकाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:33 IST
तामिळनाडू राज्यातील एका युवकाचे रेल्वे प्रवासात पाकीट व मोबाईल चोरी गेल्याने टी.सी.ने त्याला मध्येत उतरवून दिले. त्यामुळे ट्रकचालकाच्या मदतीने तो गुरुकुंज मोझरीत पोहचला. येथील मानवता फाऊंडेशनच्यावतीने त्याला तिकिटापूर्ते पैसे वर्गणीतून गोळा करून माणुस्कीचा परिचय दिला.
परराज्यातील आर्थिक विवंचनेत सापडलेल्या युवकाला मदत
ठळक मुद्देमानवतेचे दर्शन : मानवता फाऊंडेशनने घेतली दखल