शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे फुटाच्या खड्ड्यांतील डासांचा शाळेत हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:22 IST

डेंग्यूचे थैमान सर्वत्र असताना, मंगरूळ चव्हाळा येथे मात्र तब्बल दोनशे फुटांच्या हिरव्यागार पाण्याच्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी खड्ड्यांची मोजणी व पूजन करून सरपंच व ग्रामसचिवांचा निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देतक्रार देऊनही प्रशासन ढिम्म : विद्यार्थ्यांनी केली खड्ड्याची पूजा

वीणेश बेलसरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळ चव्हाळा : डेंग्यूचे थैमान सर्वत्र असताना, मंगरूळ चव्हाळा येथे मात्र तब्बल दोनशे फुटांच्या हिरव्यागार पाण्याच्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी खड्ड्यांची मोजणी व पूजन करून सरपंच व ग्रामसचिवांचा निषेध व्यक्त केला.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे वॉर्ड क्र. १ मध्ये सुमारे २०० फुटांचा साचलेल्या हिरव्यागार पाण्याचा खड्डा आहे. या खड्ड्यांतील पाण्याची दुर्गंधी येते तसेच डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. या खड्ड्याच्या आजूबाजूने जि.प. प्राथमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामस्थांची घरे आहेत.मंगरूळ चव्हाळा येथील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी हा खड्डा मोजून घेतला आणि पूजन करून सरपंच व सचिवांचा निषेध व्यक्त केला. या खड्ड्यासह अनेक ठिकाणी डबके साचले असून, ग्रामपंचायत प्रशासन उपाययोजना करीत नसल्याचा आरोप होत आहे. डबक्यामुळे डेंग्यूची भीती नागरिकांमध्ये कायम आहे.चार ते पाच वर्षांपासून खड्डा ‘जैसे थे’ आहे. आम्ही ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी केल्या. आजूबाजूने शेणखताचे ढिगारे आहेत. परंतु, याकडे ग्रामपचायत लक्ष देत नाही.- अशोक बन्सोड, ग्रामस्थमागील महिन्यात गावात एक डेंग्यूरुग्ण आढळला होता. या महिन्यात सध्या डेंग्यूरुग्ण नाही. थंडी वाजून ताप येत असेल, तर उपचार करून घ्यावेत.- शुभांगी खैरकर,वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य