शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 07:50 IST

Western Vidarbha News: यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे.

अमरावती - यंदाच्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील तब्बल ६.०८ लाख हेक्टरमधील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके बाधित झाल्याचा अहवाल कृषी सहसंचालक कार्यालयाने दिला आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यातच ४.५८ लाख हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे. त्यातच पुढील चार दिवस हवामान विभागाने येलो अलर्ट' जाहीर केल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १,०८,९१३ शेतकऱ्यांच्या ९८,२०९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी एनडीआरएफच्या निकषाने ८८.२३ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक ८७,३९० हेक्टरमध्ये नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झालेले आहे. जुलै महिन्यात २०४ शेतकऱ्यांच्या ५२,९२९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ३१,५४२ हेक्टरमध्ये नुकसानदेखील बुलढाणा जिल्ह्यातील आहे.

पश्चिम विदर्भात यवतमाळ व वाशिम जिल्हा वगळता अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यात पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. तरीही ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी १५ टक्के तूट भरून निघाली. 'महावेध'च्या अहवालानुसार, विभागात आतापर्यंत ५८१.५ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना ५७८.५ मिमी पाऊस झालेला आहे.

आठ दिवसांत ४.५८ लाख हेक्टर बाधितऑगस्ट महिन्यात १३ ते २० तारखेदरम्यान संततधार पाऊस, अतिवृष्टीने विभागात ४४ तालुक्यांतील ३१५२ गावे बाधित झाली. या गावांमध्ये ४,५७,५८८ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १,१८,३५९ हेक्टर, वाशिम ९८,३५३ हेक्टर, अकोला ९६,९४१ हेक्टर, बुलढाणा ८९,७२८ हेक्टर व अमरावती जिल्ह्यात ५४,२०६ हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. या बाधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :floodपूरVidarbhaविदर्भ