शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकांच्या सुनावण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:00 IST

जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय आक्षेपांवरील सुनावण्या तीन ते चार महिन्यांपासून खोळंबल्या आहेत. अभिजित बांगर व ओमप्रकाश देशमुख या दोन जिल्हाधिकाऱ्यांची लागोपाठ बदली झाल्याने हा पेच निर्माण झाल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे असले तरी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची बदली हा प्रक्रियेचा भाग आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी देतील काय लक्ष? : प्रशासनाची वेळकाढू भूमिका

पंकज लायदे ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी व प्रशासकीय आक्षेपांवरील सुनावण्या तीन ते चार महिन्यांपासून खोळंबल्या आहेत. अभिजित बांगर व ओमप्रकाश देशमुख या दोन जिल्हाधिकाऱ्यांची लागोपाठ बदली झाल्याने हा पेच निर्माण झाल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे असले तरी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची बदली हा प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे तक्रारदारांनी दाद मागायची तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या खोळंबलेल्या सुनावण्या पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा आहे.जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींनी शासकीय मालमत्तेचे जतन करण्याच्या दृष्टीने नियमानुसार प्रक्रिया न राबविणे, नगरविकासाला बाधक ठराव, अपात्र नगरसेवकांबद्दल निर्णय, तीन अपत्ये, अतिक्रमण, नगरपंचायत मालमत्तेची अवैध खरेदी, त्यांच्या नातेवाइकांचा पालिकेमध्ये हस्तक्षेप यासंदर्भातील तक्रारींबाबत सामान्य नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे अपील अर्ज सादर केले आहेत. त्या अपील अर्जांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सहा महिन्यांत निर्णय देणे अपेक्षित असते; परंतु सामान्य नागरिकांनी एक ते दीड वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या संबंधित तक्रारीच्या अपील अर्जांवर अद्यापही सुनावणी झालेली नाही. सामान्य नागरिकांनी तक्रार करणे चुकीचे आहे का तसेच त्यांना न्याय मिळणार की नाही, असे नानाविध प्रश्न निर्माण झाले आहेत.५ डिसेंबर २०१८ पासून सुनावणी ठप्पतत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर व अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यासंदर्भातल्या काही सुनावण्या १४ नोव्हेंबर २०१८ पर्यंत नियमित घेतल्या. त्यानंतर ५ डिसेंबर २०१८ ही तारीख काही प्रकरणांत देण्यात आली. परंतु, नोव्हेंबर महिन्यातच अभिजित बांगर यांची नागपूरला बदली झाली. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांचीसुद्धा ५ डिसेंबर रोजी बदली झाली. त्यानंतर संपूर्ण सुनावण्या ठप्प पडल्या. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या कार्यकाळात एकही सुनावणी झाली नाही. त्यांचीसुद्धा बदली झाल्याने ५ डिसेंबर २०१८ पासून एकही सुनावणी झाली नाही.सहा महिन्यांपासून दोन नगरसेवकांच्या अपात्रतेचे प्रकरण जिल्हाधिकाºयांकडे सादर केले आहे. त्यावर अद्यापही सुनावणी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे न्याय मागावा तरी कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- राजन सरागे, अपिलार्थी, धारणीजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मदारजिल्ह्यातील १० नगरपालिका व चार नगरपंचायतींबाबत शेकडो सुनावण्या प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन निर्णय दिल्यास पुढील मार्ग सुकर होतो. त्यांचा निर्णय अपिलार्थीस मान्य नसल्यास विभागीय आयुक्त वा न्याय यंत्रणेकडे दाद मागता येते. तत्पूर्वी जिल्हधिकाऱ्यांनी निर्णय देणे क्रमप्राप्त आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी