शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"नागरिकांच्या आरोग्याची काळजी ही तुमची जबाबदारी; कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 14:03 IST

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही त्यांच्यासाठी देव आहात - आरोग्य मंत्री तानाजी सावंत

 नरेंद्र जावरे 

परतवाडा (अमरावती) : रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्यावर योग्य उपचार करा योग्य औषधसाठा त्यांना उपलब्ध करून द्या. तुम्ही त्यांच्यासाठी देव आहात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच तुमची जबाबदारी आहे. कुठल्याच प्रकारची हयगय झाल्यास आपण खपवून घेणार नसल्याचा दम आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी येथील विश्रामगृहात आयोजित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

शुक्रवारपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत निघाले आहेत. शुक्रवारी त्यांनी मेळघाटात जाण्यापूर्वीच आरोग्य विभागाचा आढावा घेतला. ग्रामीण असो की शहरी भागातील रुग्ण त्यांच्याबद्दल आपली संवेदना ठेवा. प्रत्येक रुग्णालयात स्वच्छता असावी नातेवाईकांसाठी स्वतंत्र कक्ष व तेथे सुद्धा स्वच्छतागृहे असावी, असे निर्देश सावंत यांनी दिले.

कागदपत्रे सर्व ठीक प्रत्यक्षात काय?

तानाजी सावंत यांनी आपल्या आरोग्यमंत्री पदाच्या कामाची चुनूक त्यांनी पहिल्याच बैठकीत दाखविल्याने उपस्थित आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी योग्य बोलत आहे किंवा नाही? याची पडताळणी करताना दिसून आले. कागदोपत्री असलेला आराखडा त्यातील प्रत्येक खुलासा व माहिती जाणून घेत त्यावर सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या.

खपवून घेणार नाही

रुग्णांप्रती असंवेदनशील असलेल्या कुठलाही कर्मचारी अधिकारी असो अशी वागणूक आपण खपवून घेणार नाही योग्य उपचार करण्यासाठी व कामासाठीच तुम्ही आहात रुग्णासाठी तुम्ही देव आहात. त्यामुळे देवासारखे त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी यातून दिला.

टॅग्स :Healthआरोग्यTanaji Sawantतानाजी सावंतhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरAmravatiअमरावती