शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

'तो' बिबट्या उपद्रवी नव्हता म्हणून सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

जंगलात सोडण्यापूर्वी म्हणे या बिबट्याचे चारित्र्य तपासले गेले. हा बिबट्या उपद्रवी नव्हता. मानव-वन्यजीव संघर्षात तो सहभागी नव्हता. तो चारित्र्यवान होता म्हणून त्याला सोडल्याचे सांगितले जात आहे. खरेतर वन्यजीवांमध्ये जंगलाचा राजा असलेल्या पट्टेवाल्या वाघाची एखादवेळी गॅरंटी देता येईल. पण, बिबट्यासारख्या लबाड प्राण्याची गॅरंटी दिली गेली हे मात्र नवलच.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : औषधोपचारासाठी परतवाडा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला जखमी अवस्थेत दाखल कारंजा लाड वनपरिक्षेत्रातील त्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यास थोडी घाईच झाली. त्याची जखम पूर्णपणे बसलेली नव्हती. मेळघाटातील जंगलात त्याला सोडले गेले. म्हणे ती ओली जखम तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात चाटून बरी करणार. पण जंगलात वावरताना ती जखम वाढल्यास त्यावर औषधोपचार कोण करणार आणि ती जखम चाटून बरी होणार होती तर मग ८० किलोमीटरचा प्रवास करून त्याला ट्रीटमेंट सेंटरला आणले कशाला? दरम्यान, पूर्वानुभवाच्या आधारावर वन्यजीव अधिकाऱ्यांसह तज्ज्ञ अभ्यासकांच्या बैठकीत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. जंगलात सोडण्यापूर्वी म्हणे या बिबट्याचे चारित्र्य तपासले गेले. हा बिबट्या उपद्रवी नव्हता. मानव-वन्यजीव संघर्षात तो सहभागी नव्हता. तो चारित्र्यवान होता म्हणून त्याला सोडल्याचे सांगितले जात आहे. खरेतर वन्यजीवांमध्ये जंगलाचा राजा असलेल्या पट्टेवाल्या वाघाची एखादवेळी गॅरंटी देता येईल. पण, बिबट्यासारख्या लबाड प्राण्याची गॅरंटी दिली गेली हे मात्र नवलच.मेळघाटातील वाघाच्या प्रदेशात सोडल्या गेलेल्या या जखमी बिबट्यावर देखरेख ठेवण्याची, त्याचे मॉनिटरिंग करण्याची कुठलीही तरतूद नाही. सेमाडोह वनपरिक्षेत्र अंतर्गत कारा गोलाई या अतिसंरक्षित क्षेत्रात सोडला गेलेला बिबट्या तीन दिवसात कुणालाही दिसलेला नाही. त्याच्या अस्तित्वाचे पुरावेही मिळालेले नाहीत.ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला केवळ चार दिवस त्या बिबट्यावर औषधोपचार केला गेला. त्यातही अत्यंत गोपनीयता ठेवली गेली. या चार दिवसात त्या बिबट्याच्या प्रकृतीविषयी एकदाही वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्धीस दिले नाही. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला बिबट्याचा मुक्काम पिंजऱ्यातून नाईट सेंटरला/ रात्र निवाऱ्यात हलविला गेला. तो तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले गेले. त्याची आक्रमकता बघता इतर दुखापती होऊ नये म्हणून म्हणे त्याला जंगलात सोडले.

जंगलात सोडण्यायोग्य झाल्याची खात्री केली नाहीखरेतर या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरला वाघाकरिता, बिबट्याच्या सोयीसाठी रात्र निवाऱ्यासह मोकळ्या वातावरणात, खुल्या जागेत, जाळीचे भले मोठे उंच आवरण असलेली ही जागा आहे. औषधोपचारानंतर तो वाघ किंवा बिबट किंवा अन्य वन्यजीव नैसर्गिक अधिवासात सोडण्याइतपत बरा झाला काय, याच्या पडताळणीकरिता ही जागा निवडली आहे. पण या मोकळ्या जागेत सोडून तो बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यायोग्य झाला काय याची पडताळणी झालीच नाही.

 

टॅग्स :leopardबिबट्या