शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ज्या ठाण्यात कार्यरत, तेथेच झाली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

अनेक गुन्हेगारांना अटक करणारा लेवटकर हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला अटक करताना गाडगेनगर पोलिसांनादेखील काही वेळेसाठी कसेनुसे झाले. आधी ३० हजार रुपये व आणखी २० हजार रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मूळ खरेदीखताची प्रत देण्यासाठी लेवटकरने ती लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यात स्वत:विरुद्ध गुन्हा नोंदविला गेल्यानंतर तेथेच अटक होण्याची नामुष्की लाचखोर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लेवटकरवर ओढविली. अनेक गुन्हेगारांना अटक करणारा लेवटकर हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला अटक करताना गाडगेनगर पोलिसांनादेखील काही वेळेसाठी कसेनुसे झाले. आधी ३० हजार रुपये व आणखी २० हजार रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मूळ खरेदीखताची प्रत देण्यासाठी लेवटकरने ती लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या तपासात उघड झाले. कठोरा रोडवरील उर्वशीनगरातील निवृत्त व्यक्तीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी लेवटकर व रोहन भोपळे या खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. गाडगेनगर ठाण्यातील ड्युटी ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक खंडारे यांनी आपल्याच ठाण्यात कार्यरत सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लेवटकरने २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१९ ते ३.४३ या कालावधीत गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारली.

घरी आढळले पाच तोळे सोनेपीएसआय लेवटकरला रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. घरी पाच तोळे सोने आढळून आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने लेवटकरच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची,  दस्तावेजांची शहानिशा होणार असल्याची माहिती अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

लाचखोरांची विभागीय चौकशीलाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या कार्यालयाची तपासणी करण्यात येणार आहे. अशा अधिकाऱ्यांचे कार्यालयीन वर्तन, हाताळलेली प्रकरणे, गोपनीय अहवालातील प्रतिकूल नोंदी असल्यास त्यांची विभागीय चौकशीचे आदेश राज्य सरकारने सन २०१८ मध्येच दिले आहेत.

निलंबनाची कारवाई लाचखोरीप्रकरणी एसीबीकडून पकडल्या गेल्यानंतर लेवटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शनिवारी त्याबाबतचे आदेश काढले. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

टॅग्स :PoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण