शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तो युवक कीटकनाशक फवारणी विषबाधेचाच बळी, दोन महिन्यांत तीन शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 19:25 IST

अमरावती : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथील शेतमजुराचा २२ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मात्र, कृषी विभागाने घोंगडे झटकले होते.

अमरावती : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथील शेतमजुराचा २२ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मात्र, कृषी विभागाने घोंगडे झटकले होते. आता शवविच्छेदन अहवालअंती हा युवक विषबाधेचाच बळी असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कुटुंबास शासकीय मदत मिळावी, यासाठी महसूल विभागाद्वारा अद्यापही कार्यवाही झाली नाही. जिल्ह्यात यापूर्वी दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला असल्याने मृतांची संख्या तीन झाली.नितीन रामेश्वर सुरजुसे (३०) असे मृताचे नाव आहे. तो वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड तालुक्यातील पिंपरी (मोखड) येथील रहिवासी होता. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तो काही दिवसांपासून लेहगावला मामा विजय श्रीनाथ यांच्याकडे वास्तव्य करून शेतमजुरीची कामे करीत होता. मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी नितीनने लेहगाव येथील एका शेतक-याच्या तुरीवर इमामबेंजाईड या कीटकनाशकाची फवारणी केली. कामावरून आल्यानंतर चक्कर येत असल्याने नातेवाइकांनी त्याला दर्यापूर येथील वैद्यकीय व्यवसायी राजेंद्र भट्टड यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, १५ मिनिटात त्याचा मृत्यू झाला. भट्टड यांनी कृषी विभाग व पोलिसांना नितीनचा मृत्यू हा कीटकनाशकाच्या विषबाधेने झाल्याचे कळविले असतानाही यंत्रणाद्वारा यासाठी दुजोरा दिला नव्हता.नितीनचे निवडणूक ओळखपत्र लेहगावचेयंदा कीटकनाशक विषबाधेचे १६० रुग्ण दाखल झालेत. यापैकी तीन शेतक-यांचा मृत्यू झाला. यामध्ये माहुली जहागीर ठाण्यांतर्गत डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला, येवदा ठाण्यांतर्गत किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला, तर २२ नोव्हेंबरला नितीन सुरजुसे या शेतमजुराचा मृत्यू झाला. त्याचे आधार कार्ड वाशिम जिल्ह्यातील, तर निवडणूक ओळखपत्र अमरावती जिल्ह्याचे आहे. त्याच्या कुटुंबाला कुठल्याही जिल्ह्यात का होईना, शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती