सुरेश सवळे चांदूरबाजारअधिकमासाच्या निमित्ताने देऊरवाड्याला दर्शनासाठी गेलेल्या इसमाचा त्रिवेणी संगमावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या अशा मृत्यूने समाजमन हळहळले. त्याच्या अंत्ययात्रेत सर्व धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. गोपाल उर्फ गोपी रामभाऊ शिरभाते हा ४७ वर्षीय इसम सोमवारी आपल्या कुटूंब व सवंगड्यांसोबत श्रीक्षेत्र देऊरवाडा येथे गेला होता. तो दरवर्षी आपल्या सवंगड्यांसोबत गजाननाची वारी पायदळ करायचा. तशी त्याने याही वर्षी केली होती. त्कुटुंबासह सर्वांनी त्रिवेणी संगमावर स्रान केले. देऊरवाडा येथील सर्व देवांचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. हृदयविकाराने उपचारापूर्वीच मृत्यूचांदूरबाजार : सामूहिक भोजनाला सुरुवात झाली. आधी सर्वांना महाप्रसादाचा लाभ देऊन नंतर आपण भोजन करायचे असा बेत आखणाऱ्या गोपी जेवायला बसला आणि पहिला घास घेताना त्याच्या छातीत दुखून आले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुलींसह मोठा परिवार आहे.
त्याने देऊरवाड्याच्या ‘त्रिवेणी संगमा’वर ठेवला देह
By admin | Updated: July 17, 2015 00:17 IST