शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

चोरून आणलेल्या दुचाकी विकण्यासाठी ‘तो’ बनला ‘आरटीओ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

शिरजगाव बंड येथील एका २४ वर्षीय आरोपीने चोरीच्या वाहनांची बनावट आरसी बनवून ग्राहकांना देत असल्याच्या कबुलीजबाबानंतर हा प्रकार उघड झाला. अन् काही वेळासाठी पोलीस यंत्रणा देखील अवाक झाली. त्यामुळे आता आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान आरोपींना २३ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. 

ठळक मुद्देआरटीओच्या संकेत स्थळाचा आधार

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चोरीचे वाहन सहजासहजी कुणी विकत घेत नाही. जुने वाहन खरेदी करत असताना वाहनाची आरसी (रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट) पाहिली जाते. सबब, ‘त्या’ चोरांसमोर चोरीच्या दुचाकीच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला. मग काय, चोरांच्या टोळीतील एक तरूणच खुद्द  ‘आरटीओ’ बनला अन् सुरू झाला वाहनांची बनावट आरसी बनविण्याचा गोरखधंदा. त्यातून चक्क ३१ चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यात आली.शिरजगाव बंड येथील एका २४ वर्षीय आरोपीने चोरीच्या वाहनांची बनावट आरसी बनवून ग्राहकांना देत असल्याच्या कबुलीजबाबानंतर हा प्रकार उघड झाला. अन् काही वेळासाठी पोलीस यंत्रणा देखील अवाक झाली. त्यामुळे आता आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान आरोपींना २३ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. चांदूरबाजार,  ब्राम्हणवाडा थडी व चांदूरबाजार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे दुचाकीचोरांनी धूम केली.  विविध गुन्हे देखील दाखल झालेत. पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तीनही पोलीस ठाणे प्रमुखांचा ‘क्लास’ घेतला. बरहुकूम, तीनही पोलीस ठाण्यांनी संयुक्त अभियान राबवून माहितीची जमावाजमव केली. यात पहिल्यांदा हाती आला तो सोनोरीचा उज्ज्वल बोराडे. एकामागून एक नावे समोर येत गेली.  त्यातच एका आरोपीने चोरीच्या दुचाकी दोन एजंटला विक्रीसाठी दिल्याची माहिती समोर आली. एक एक करीत चोरांची संख्या पोहोचली सातवर. त्यांच्याकडून तब्बल २० लाख ३० हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर बनावट आरसी बनवून त्या विकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. अन् सरफराज मन्सूर अली शाह (२४, शिरजगाव बंड) याला गजाआड घेण्यात आले. गजाआड असताना त्याने बनावट आरसी बनवून ती ग्राहकांना बनवून देत असल्याची कबुली दिली.

आरटीओच्या संकेत स्थळाचा आधारवाहनाचा मालक, वाहन घेतल्याची दिनांक, वाहनाचा प्रकार असे एका क्लिकवर सांगणारे आरटीओचे एक अ‍ॅप आहे. त्यात वाहन क्रमांक टाकल्यास वाहनांची इत्यंभूत माहिती समोर येते. त्या अ‍ॅपचा आधार घेऊन आरोपी सरफराज मन्सूरअली शाह याने बनावट आरसी बनविण्याचा गोरखधंदा केला असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. चोरीच्या वाहन विक्रीसाठी त्याने किती बनावट आरसी बनविल्या, त्या बनावट आरसीच्या आधारे किती वाहनांची विक्री झाली, हे तपासात समोर येणार आहे.

आरोपी नवखे अन् एकाच तालुक्यातीलदुचाकी चोरीचे रॅकेट गजाआड केल्यानंतर त्या सात जणांविरुद्ध कुठे गुन्हे दाखल आहेत का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप तरी त्यांच्याविरुद्ध असे कुठलेही गुन्हे नोंद नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, सातही आरोपी केवळ २१ ते २८ वर्षे वयोगटातील  आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी, पिंपरी, हैदतपूर वडाळा, शिरजगाव बंड, माधान या शेजारी गावांतील आहेत. त्यांचे ‘कनेक्शन’ पोलीस धुंडाळत आहेत. 

आणखी दोन दुचाकी जप्त१८ जून रोजी अटक सात आरोपींकडून २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या, तर त्यानंतर आणखी दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याने चोरीच्या दुचाकींची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्या धारणी व चांदूरबाजार येथून जप्त केल्या. 

शुक्रवारी सात तरूण आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एका आरोपी वाहनांची बनावट आरसी बनवत होता. त्याने ती कल्पना एका अ‍ॅपवरून उचलली होती, अशी कबुली दिली आहे. - सुनील किनगे, ठाणेदार, चांदूरबाजार 

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर