शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सळाखीने मारहाण दोन चिमुकल्यांना विष पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:01 IST

नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे पूर्ण कुटुंब पॉवर हाऊसनजीकच्या झोपडीत आले. तेथे महेंद्रने पत्नी ज्योत्स्ना हिला सळाखीने मारहाण केली. ती जीव वाचवत बाहेर पडली असता, त्याने आदर्श व अनन्या या चिमुकल्यांना पेल्यातून तणनाशक विषारी द्रव्य पाजले. त्यावेळी तो थोडादेखील थरथरला नाही. बाबा, काहीतरी पाजत आहेत, असे वाटल्याने चिमुकल्या आदर्शने ते द्रव्य प्राशन केले, तर अनन्या तर अबोधच होती. मुलांना पाजल्यानंतर महेंद्रने देखील तेच तणनाशक प्राशन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घरगुती किरकोळ वादातून सळाखीने पत्नीला मारहाण केल्यानंतर एका माथेफिरूने पोटच्या दोन मुलांना विषारी औषध पाजले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानेदेखील विषारी द्रव्य प्राशन करून आत्मघात करण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या पाच वर्षीय मुलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्याला व त्याच्या दोन वर्षीय बहिणीला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. नांदगाव पेठ येथील पॉवर हाऊसनजीकच्या झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी महेंद्र सुभाष राऊत (वय ३२, रा. माळीपुरा, नांदगाव पेठ) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३२८, ३२३, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी ११.५० मिनिटांच्या सुमारास पती महेंद्र याने किरकोळ वादातून आपल्याला सळाखीने मारहाण केली. तथा आपल्या आदर्श (वय ५) व अनन्या (२) या दोन मुलांना विष पाजले. त्याने देखील विष घेतल्याची तक्रार महेंद्र राऊत याची पत्नी ज्योत्स्ना राऊत (२४) हिने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. जिल्हा सामान्य रुग्णालयात तिचा जबाब नोंदविण्यात आला. यात आदर्शची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, त्याच्यासह अनन्याला देखील नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता ज्योत्स्ना यादेखील मुलांसोबत नागपुरात गेल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात किरकोळ वादातून महेंद्रने हे टोकाचे पाऊल उचलल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. मात्र आदर्शच्या शाळा प्रवेशावरुन दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले. त्यातून महेंद्रने हे पाऊल उचलल्याचा अन्य एक घटनाक्रम समोर आला आहे. ज्योत्स्ना राऊत यांच्या आईने हा घटनाक्रम विषद केला असून जावाई महेंद्र याने आपल्या मुलालादेखील मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला आहे. हा घटनाक्रम अद्यापपर्यंत पोलीस दप्तरी नोंदविला गेलेला नाही. महेंद्र राऊत याच्या अटकेनंतरच या घटनेमागचा उलगडा होईल, अशी माहिती नांदगाव पेठ पोलिसांनी दिली आहे. पोलीस व डॉक्टर आदर्शच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत, 

तो वाॅर्ड क्रमांक १०,  ती वाॅर्ड क्रमांक १२ मध्येसुमारे १२.४५ च्या सुमारास ज्योत्स्ना मुलांना घेऊन इर्विनमध्ये पोहोचली, तर काही प्रत्यक्षदर्शींनी महेंद्रला देखील इर्विनला आणले. त्याच्यावर वाॅर्ड क्रमांक १० मध्ये उपचार सुरू आहेत, तर ज्योत्स्नाला वाॅर्ड क्रमांक १२ मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, पोटचे गोळे अत्यवस्थ असल्याने स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता तिने सुटी घेतली. ती मुलांसोबत नागपूरला गेली.

रोजच झडत होते वादनांदगाव पेठ येथील माळीपुरा येथे राहणाऱ्या राऊत दाम्पत्यात नेहमीच वाद झडत होते. माळीपुऱ्यासह महेंद्र हा नजीकच्या पॉवरहाऊस परिसरातील अतिक्रमित झोपडीत देखील राहत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे पूर्ण कुटुंब पॉवर हाऊसनजीकच्या झोपडीत आले. तेथे महेंद्रने पत्नी ज्योत्स्ना हिला सळाखीने मारहाण केली. ती जीव वाचवत बाहेर पडली असता, त्याने आदर्श व अनन्या या चिमुकल्यांना पेल्यातून तणनाशक विषारी द्रव्य पाजले. त्यावेळी तो थोडादेखील थरथरला नाही. बाबा, काहीतरी पाजत आहेत, असे वाटल्याने चिमुकल्या आदर्शने ते द्रव्य प्राशन केले, तर अनन्या तर अबोधच होती. मुलांना पाजल्यानंतर महेंद्रने देखील तेच तणनाशक प्राशन केले. हाकेच्या अंतरावर असलेल्या ज्योत्स्नाला ते माहीत होताच, ती पिल्लांना बिलगून रुग्णालयात घेऊन आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस