शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नराधम पित्याला नागपुरातून अटक, मुलीला बो-यात भरून नदीत टाकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 19:59 IST

घोराड येथील एका नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर अत्याचार करून तिला बो-यात भरून नदीत टाकले होते.

वरूड (अमरावती) : तालुक्यातील घोराड येथील एका नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर अत्याचार करून तिला बो-यात भरून नदीत टाकले होते. तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस त्याच्या शोधात सोमवारी वरूड पोलीस नागपूर येथील नराधमाच्या दुस-या पत्नीच्या घरी गेले असता, रेवनाथ धुर्वे तेथे आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.तालुक्यातील घोराड येथे कामाच्या शोधात आलेले मध्य प्रदेशातील आदिवासी रेवनाथ रामप्रकाश धुर्वे (३६, रा. देवी पडोला ता. सौसर जि. छिंदवाडा  म.पी ) याने दारूच्या नशेत त्याच्या घोराड येथील खोपडीत  शुक्रवारी दुपारी चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केला व मुलीला बो-यात भरून गावालगतच्या नदीत टाकले होते. आरोपी मुलीचा पिता मात्र फरार झाला होता. आरोपी पित्याविरुद्ध कलम ३७६, ३६६, पोस्को (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपी रेवनाथ हा सिंधी झुलकी ता. कलमेश्वर जिल्हा नागपूर येथील दुस-या पत्नीच्या घरी आढळून आला. सदर कारवाई एपीआय विजय शिंगाडे, सुजित कांबळे, पीएसआय प्रिया उमाळे, जमादार संतोष ठाकरे यांच्यासह वरूड पोलिसांनी केली.  पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी, ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात वरुड पोलीस करीत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती