सकाळी नाश्ता करायचा अन् कामाला जायचं; दुपारचं जेवण अमरावतीचा डबेवाला आणेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:41 PM2024-03-04T23:41:35+5:302024-03-04T23:41:43+5:30

मुंबईचा डबेवाला पॅटर्न अमरावतीत

Have breakfast in the morning and go to work; Lunch will be brought to Dabewala from Amravati! | सकाळी नाश्ता करायचा अन् कामाला जायचं; दुपारचं जेवण अमरावतीचा डबेवाला आणेल!

सकाळी नाश्ता करायचा अन् कामाला जायचं; दुपारचं जेवण अमरावतीचा डबेवाला आणेल!

- मनीष तसरे 

अमरावती : डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहोचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते, त्या कारणाने मुंबईचा डबेवाला संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत आणि तोच पॅटर्न अमरावतीतदेखील राबविण्यात येत आहे. काळानुरूप बदल होऊन अमरावतीतसुद्धा ‘डबेवाला’ ही सेवादेखील पाहायला मिळत आहे.

अमरावती शहर हे देखील आता विस्ताराने अवाढव्य झाले. अनेक उद्योगधंदे हे शहराच्या बाहेर आले. शहराला लागून असलेल्या नांदगाव पेठनजीक होलसेल कपडा व्यवसाय सुरू झाला. दुकानाच्या कामाच्या जागी वेळेवर पोहोचण्यासाठी दुकानदार व नोकरदार मंडळींना घरातून लवकर निघावे लागते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा दुकानात पाठवू शकतात.

शहरातून अनेक कपडा व्यावसायिक नांदगाव पेठनजीक असलेल्या सोटी लँड, बिझी लँड आणि ड्रीम लँड या ठिकाणी असलेल्या होलसेल कपडा मार्केटमध्ये स्थिर झाले. दुकाने उघडण्यासाठी सकाळी घरून लवकर निघावे लागते, त्यामुळे दुपारचा जेवणाचा डबा सोबत घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत डबेवाला घरून डबा दुकानात पोहोचून देतात.
 

Web Title: Have breakfast in the morning and go to work; Lunch will be brought to Dabewala from Amravati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.