शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हार्डकोअर चेनस्नॅचर्स जेरबंद, हेल्मेट, चाकूही गवसला, सोने घेणारे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व डीबीचे पथक मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत गस्त घालत होते. त्यावेळी मो. समीर या पोलिसाचे दुचाकीवरील दोघांकडे लक्ष गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याच्या गळ्यात केशरी पिवळा दुपट्टा होता. ते चेनस्नॅचर असल्याची खात्री पटताच मो. समीर यांनी त्यातील एकावर झडप घातली. हाती आलेल्याची ओळख जगजितसिंह टांक (२९, रा. नांदगाव पेठ) अशी पटविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरापासून शहरात धुडगूस घालणाऱ्या मंगळसूत्र चोरांच्या दुकलीला पकडण्यात गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी सायंकाळी यश आले. यंदाच्या चेनस्नॅचिंगच्या तब्बल ११ घटनांची कबुली त्या चोरजोडीने दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हेल्मेट व चाकू जप्त करण्यात आला. सोन्याच्या रिकव्हरीसाठी एक पथक स्थानिक सराफा बाजारात तळ ठोकून आहे. यात अन्य तिघांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व डीबीचे पथक मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत गस्त घालत होते. त्यावेळी मो. समीर या पोलिसाचे दुचाकीवरील दोघांकडे लक्ष गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याच्या गळ्यात केशरी पिवळा दुपट्टा होता. ते चेनस्नॅचर असल्याची खात्री पटताच मो. समीर यांनी त्यातील एकावर झडप घातली. हाती आलेल्याची ओळख जगजितसिंह टांक (२९, रा. नांदगाव पेठ) अशी पटविण्यात आली. विकेश रावसाहेब खंडारे (२४, सरस्वतीनगर, नांदगाव पेठ) हा पसार झाला. जगजितसिंगला ताब्यात घेऊन गाडगेनगरला आणण्यात आले. तेथे डीसीपी मकानदार, एसीपी पूनम पाटील व पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्यापुढे उपस्थित केले. त्यानंतर जगजितसिंगने शहरातील ११ गुन्ह्यांची कबुली दिली. मंगळवारी उशिरा रात्री विकेशला नांदगाव पेठ येथून अटक करण्यात आली.  पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

गाडगेनगर पोलीस ब्रेव्हो!आधी पाठलाग करायचा न्‌ गळ्यात हात टाकून मंगळसूत्र हिसकावून दुचाकीने पळ काढायचा. हा चेनस्नॅचर्सचा शिरस्ता. मात्र, अलीकडच्या दोन घटनांमध्ये चाकूचा धाक दाखवून चेनस्नॅचिंग झाली. दोन्ही घटना मॉर्निंग वॉक करताना घडल्या. त्यामुळे महिला प्रचंड धास्तावल्या होत्या. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांना काही काळ असंतोषाचा सामना करावा लागला. त्यावर मात करत गाडगेनगर पोलिसांनीच त्या चोराला पकडले. विशेष म्हणजे,  त्याच्याकडून ११ गुन्ह्यांची कबुली घेण्यात यश मिळविले.

नंबर प्लेटला ओली मातीजगजितसिंगकडून एमएच २७ सीटी ४०१४ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली. चेनस्नॅचिंग करतेवळी तो दोन्ही नंबरप्लेटवर ओली माती लावायचा. मंगळवारीदेखील त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेट मातीने भरलेल्या होत्या.

अशी दिली गुन्ह्यांची कबुली

गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या सहा, फ्रेजरपुऱ्यात दोन व नांदगाव पेठ येथील तीन अशा एकूण ११ चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली जगजितसिंग प्यारासिंग टांक याने दिली आहे. ज्या दोन घटनांमध्ये चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र लुटण्यात आले, त्यात विकेश खंडारे त्याच्यासोबत होता. 

पोलीस आयुक्तांचे स्ट्राँग पोलिसिंगयंदाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत चेनस्नॅचिंगच्या १४ घटनांची पोलीस दप्तरी नोंद झाली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या कमालीच्या गंभीर झाल्या. अधिनस्थ यंत्रणेची त्यांनी कानउघाडणीदेखील केली. स्काॅड निर्माण केले. हिस्ट्रिशिटर तपासले. नाकाबंदी, गस्त वाढविली. घटनांचे अवलोकन करून सूक्ष्म निरीक्षण नोंदविले. त्याचा परिपाक म्हणून गाडगेनगर पोलिसांना चेनस्नॅचर्सच्या मुसक्या आवळण्यात यश आले. पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, प्रभारी ठाणेदार अनिल कुरळकर व ठाणेदार आसाराम चोरमले यांचादेखील त्यात सिंहाचा वाटा आहे.

 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीPoliceपोलिस