शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांच्या सुटकेसाठी लेकीची प्रार्थना, राणाकन्येचं हनुमान चालिसा पठण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:33 IST

नवनीत राणा यांची 8 वर्षांची कन्या आरोही हिने अमरावतीतील निवासस्थानी हनुमान चालिसा पठण केले

अमरावती/मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयानंही दिलासा दिलेला नाही. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांनाही आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या कन्येसह त्यांच्या समर्थकांनी राणा दाम्पत्याच्या सुटकेसाठी हनुमान चालिसा पठण केले.

नवनीत राणा यांची 8 वर्षांची कन्या आरोही हिने अमरावतीतील निवासस्थानी हनुमान चालिसा पठण केले. आई-वडिलांची तुरुंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी हे पूजन, पठण केले.  मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने धरला होता. त्यामुळे, मुंबई आणि अमरावती येथील राणांच्या निवासस्थानी शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्य बाहेर आल्यास आपण त्यांना हनुमान मंदिराचा प्रसाद देणार असल्याचं शिवसैनिक सांगत होते. त्यातूनच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. मात्र, या नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात कलम ३५३ गुन्हा दाखल करण्यात आला. याची नोंद वेगळ्या एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. 

२९ एप्रिल रोजी जामिनावर सुनावणी

राणा दाम्पत्यानं जामीनाच्या प्रयत्नांसाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. पण, न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या याचिकेवर २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. त्यानंतरच सुनावणीची तारीख ठरवू असं सत्र न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे राणा दाम्पत्याला आता २९ एप्रिलपर्यंत कोठडीतच राहावं लागणार आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसCourtन्यायालय