शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

लब्धप्रतिष्ठितांच्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 00:18 IST

व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या २२ लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे.

पाडण्याचा खर्चही वसूलणार : कर आकारणी दुप्पट अमरावती : व्यावसायिक संकुलातील पार्किंग हडपणाऱ्या २२ लब्धप्रतिष्ठितांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. या २२ संकुलातील पार्किंगच्या ठिकाणी केलेले अनधिकृत बांधकाम गुरुवारी पाडण्यात येणार आहे. ही मोहीम गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती यंत्रणाप्रमुखांनी दिली आहे. बांधकाम पाडण्याचा खर्च संबंधित संकूलधारकांकडून वसूल केला जाणार आहे. ज्या २२ संकुलांतील पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे, त्यात हमालपुरा झोनमधील ६, बडनेरा झोनमधील ५ आणि भाजीबाजार झोनमधील ११ संकुलांचा समावेश आहे.व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी परवानगी नसताना काही व्यापाऱ्यांनी पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर झोन अभियंत्यांमार्फत तपासणी मोहीम राबविण्यात आली. ३४० मालमत्ताधारकांना नोटीसही देण्यात आल्यात. पार्किंगसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यासाठी विहित कालावधी देण्यात आला.नोटीसला अनुसरून १०७ मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. १०७ मालमत्तापैकी ३३ मालमत्तांची तपासणी करण्यात आली. त्यात २२ ठिकाणी पार्किंगचे बांधकाम अनधिकृत जागेवर केल्याचे आढळून आले. पुढील दोन आठवड्यांत या २२ ठिकाणची पार्किंग मोकळी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. त्याची सुरुवात दसऱ्यानंतर लगेचच केली जाणार आहे. ज्या २२ व्यापारी संकुलात मंजुरी व्यतिरिक्त बांधकाम केले आहे. याप्रकरणी अतिक्रमण विभागाशी संपर्क साधून पार्किंगच्या जागेतील बांधकाम काढण्याचे आदेश सहायक संचालक नगररचना यांनी संबंधित झोनच्या अभियंत्यांना दिले आहेत.दुप्पट दंड महापालिकेची परवानगी न घेता पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून ती जागा हडपणाऱ्या संकुलधारकांकडून दुप्पट दंड वसूल केला जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या कर विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. संबंभित झोन स्तरावरून ही कारवाई केली जाईल.