आॅनलाईन लोकमतअमरावती : हल्दीराम कंपनीच्या पाव ‘एक्सपायरी डेट ’आधीच चुरा झाल्याची तक्रार करण्यासाठी एका ग्राहकाने शनिवारी पोलिसांकडे धाव घेतली. संबधित ग्राहक आता अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करणार आहे.तक्रारीनुसार, युवा स्वाभिमान हॉकर्स युनियनचे शहर अध्यक्ष गणेश मारोडकर यांनी विद्युत नगर चौकातील दुर्गा ड्रायफुडस या प्रतिष्ठानातून हल्दीराम कंपनीचे पाव खरेदी केले. घरी गेल्यानंतर पावचे पाकीट उघडण्यात आले असता त्या पावचा चुरा होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी पावच्या पाकिटवरील एक्सपायरी डेट पाहिली. त्यावर २० मार्च २०१८ ही तारीख होती. खरेदी केलेली पाव ही एक्सपायरी डेटपूर्वीच खराब झाल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यांशी खेळ करणारा असल्याने गणेश मारोडकर यांनी गाडगेनगर पोलिसांकडे लेखी तक्रार सादर केली. मात्र, हे प्रकरण एफडीएच्या अधिकारातील असल्याने त्यांना एफडीएकडे जाण्याचा सल्ला दिला. गणेश मारोडकर आता सोमवारी एफडीएकडे तक्रार करणार आहे.
हल्दीरामच्या पावाचा मुदतीच्या आतच झाला चुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:25 IST
हल्दीराम कंपनीच्या पाव ‘एक्सपायरी डेट ’आधीच चुरा झाल्याची तक्रार करण्यासाठी एका ग्राहकाने शनिवारी पोलिसांकडे धाव घेतली. संबधित ग्राहक आता अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करणार आहे.
हल्दीरामच्या पावाचा मुदतीच्या आतच झाला चुरा
ठळक मुद्देपोलिसात तक्रार : एफडीएकडेही धाव