शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीसह गारपीटचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:01 IST

मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार १० जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  अमरावती शहरातही दुपारी ४ च्या सुमारास अचानक पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सुरुवातीला कोसळणारे थेंब जोरदार सरींमध्ये रूपांतरित झाले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून आ़डोशाला यावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात शनिवारी दुपारी अवकाळी पावसासह मोर्शी व भातकुली तालुक्यात गारपीट झाल्याने रबीचा हरभरा व गहू, तसेच संत्रा व इतर फळपिकांचे नुकसान झाले. याशिवाय वेचणी बाकी असलेला कापूसही भिजला आहे. अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीमधील धान्याचे पोते भिजल्यानेही शेतकरी व व्यापाऱ्यांंचे  नुकसान झाले आहे.मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार १० जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती शहरातही दुपारी ४ च्या सुमारास अचानक पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सुरुवातीला कोसळणारे थेंब जोरदार सरींमध्ये रूपांतरित झाले. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून आ़डोशाला यावे लागले. पावसामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. 

साऊर, कळमगव्हाण, लसणापूर, रामा, पुसदा, शिराळ्यात गारपीट

टाकरखेडा संभू : परिसरातील साऊर,  रामा, पुसदा, कळमगव्हाण, लसनापूर, कृष्णापूर, शिराळा आदी परिसरात शनिवारी दुपारी वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे परिसरातील तूर, हरभऱ्याला याचा फटका बसला. पावसाची शक्यता वर्तविली जात असताना साऊर परिसरात दीड वाजताच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोपडले. अर्धा ते पाऊण तास झालेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तूर आणि हरभऱ्याला याचा चांगलाच फटका बसला. ख़रिपात आधीच हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकरी गारद झाला असताना रबीवर शेतकऱ्यांच्या सर्व आशा आहेत. परंतु, अवकाळी पावसामुळे या हंगामातील पिकेदेखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या नुकसानाची पाहणी करून प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

चांदूरबाजारात पाऊस; दिवसभर ढगचांदूरबाजार/नेरपिंगळाई :  चांदूरबाजार शहरात दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. याशिवाय मोर्शी येथेही पावसाने हजेरी लावली. शेंदोळा खुर्द येथे हलका ते मध्यम पाऊस कोसळला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिवसभर कायम होते. दरम्यान, नेरपिंगळाई परिसरात तिवसा, चांदूर बाजार रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे झाडे जमीनदोस्त झाली. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे सूरज अवचार यांच्या घरावरील टीन उडाले. जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे छत उडाले. शाळा सुरू नसल्यामुळे जीवितहानी टळली. अनेकांच्या शेतात तूर पिकाची कापणी झाली असून गंजी लागलेली आहे. तलाठी पाटील, राठोड, सरपंच सविता खोडस्कर, राजेश मोहकर,  राजेश राऊत, पोलीस पाटील यांनी पाहणी केली. 

 

टॅग्स :Rainपाऊस