शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

अवकाळी, गारपिटीने व-हाडात १३९ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:50 IST

मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती विभागातील १,१५,२७२ शेतक-यांचे १,१४,६२५ हेक्टरमधील १३९ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

अमरावती - मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती विभागातील १,१५,२७२ शेतक-यांचे १,१४,६२५ हेक्टरमधील १३९ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या १२ फेब्रुवारीच्या पत्रानुसार विभागातील सर्व जिल्ह्यात ३३ ते ५० व त्यापेक्षा अधिक नुकसान याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येऊन निधीच्या मागणीसह अहवाल शनिवारी शासनाला सादर झाला. या आपत्तीमध्ये राज्यात सर्वाधिक नुकसान अमरावती विभागात झाले.

जिरायती क्षेत्रात १७ हजार ३८६ शेतक-यांचे १२,३०७ हेक्टरमध्ये ८ कोटी ३६ लाख ८५ हजाराचे ३३ ते ५० टक्के मर्यादेत नुकसान झाले आहे. यामध्ये मका ५५.३३ हेक्टर, ज्वारी १५१.४, तूर १६१.५८ , गहू ४३१ , हरभरा १०,६३७, व इतर ८६९ हेक्टरमध्ये नुकसान झाले. अमरावती जिल्हा ४,८२९ हेक्टर, अकोला ८५०.७०, यवतमाळ १२५१ बुलडाणा २,०१७ व वाशिम जिल्ह्यात ३३५८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. ३३ ते ५० टक्के मर्यादेत २७,८७९ शेतक-यांचे २१,४०० हेक्टरमधील २८ कोटी ८९ लाखांचे नुकसान झाले. यामध्ये टरबुज ५.८९ हेक्टर, कांदा ६२७.११, कांदा बी ६३.१६, केळी, पपर्ई १२३.४७, गहू ५०५०, हळद ११.८२, हरभरा १०,५३३, मका १८४, भुईमुग २१.८, भाजीपाला ८४३.१९ व इतर पिकांचे ३९३५ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये अमरावती ३,४६६ हेक्टर, अकोला ४४३.५२, यवतमाळ ९२२, बुलडाणा २१९ व वाशिम जिल्ह्यात २१९ हेक्टरमध्ये नुकसान झाले. ३३ ते ५० टक्कयांमध्ये ५९८८ शेतकºयांचे ५०४४ हेक्टरमध्ये ९ कोटी १३ लाखांचे नुकसान झाले. यामध्ये संत्रा, लिंबू, मोसंबी ४६७५ हेक्टर, आंबा ५९, डाळिंब १३९.२९ हेक्टर, केळी ४१.४३, पपई ८.७३ व इतर पिकांचे १४२ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात ६.६८ कोटी, अकोला १.०१ कोटी, यवतमाळ ४४.६५ लाख, बुलडाणा ३३.३१ लाख, बुलडाणा ६५.२३ लाखांचे नुकसान झाले आहे.

 ६४ हजार शेतक-यांचे ५० टक्क्यांवर पिके बाधित- या आपत्तीमध्ये ६४,०१९ शेतक-यांचे ७५,९०२ हेक्टरमध्ये ९३ कोटी २४ लाख ३४ हजारांचे नुकसान झालेले आहे.- जिरायती क्षेत्रात ३१,९०५ शेतक-यांचे २७,१६३ हेक्टरमध्ये १८ कोटी ४९ लाख ४७ हजारांचे नुकसान झाले.- बागायती क्षेत्रात ११,०५० हजार शेतक-यांचे २८,८४५ हेक्टरमध्ये  ३८ कोटी ९४ लाखांचे नुकसान झालेले आहे.- फळपिकामध्ये २१,०६४ शेतकºयांचे १९,८९३ हेक्टरमध्ये ३५ कोटी ८० लाख ७७ हजारांचे नुकसान झाले.

टॅग्स :HailstormगारपीटRainपाऊसAmravatiअमरावती