शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

शहरातील पानटपऱ्यांवर गुटख्याची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 5:00 AM

अनलॉकमध्ये अनेक किरकोळ व्यावसायिकांनी परवानगी नसतानाही धाडस करून पानटपऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी, गुटख्याच्या घातक अशा पुड्या, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यवसाधीन होत असून त्यांना कर्करोगसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहेत.

ठळक मुद्दे‘मागेल त्यांना गुटखा’: अन्न सुरक्षा मानके कायद्याची पायमल्ली, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

असे केले ‘स्टिंग’‘लोकमत’ची चमू कार्यालयातून १.१५ वाजता अमरावती मध्यवर्ती आगारानजीक एफडीएच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील असलेल्या पानटपरीवर पोहचली. त्याठिकाणी गुटखा विक्रेत्याकडून दोन वेगवेगळ्या कंपनीच्या ३० रुपयांच्या आठ गुटख्याच्या पुड्या विकत घेण्यात आल्या. तेथे आलेल्या काही ग्राहकांनासुद्धा सहज गुटखा उपलब्ध झाला. त्यानंतर पंचवटी चौकातील ‘लवाद न्यायालया’च्या बाजूलाच असलेल्या पानटपरींवरसुद्धा राजरोसपणे गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ३० रुपयांच्या गुटखा पुड्या विकत घेण्यात आल्या. त्यानंतर चमू इर्विन चौकात पोहोचली. तेथील एका पानटपरीवरून दोन वेगवेगळ्या कंपनीच्या पुड्या व शरीराला घातक असा सुगंधी तंबाखूसह एकूण ४० रुपयांचा गुटखा विकत घेण्यात आला. तीन ठिकाणांवरून प्रतिनिधीने १०० रुपयांचा गुटखा विकत घेतला. पानटपरीचालकाच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती दिसून येत नव्हती. ते बिनधास्तपणे गुटख्याची विक्री करीत होते.संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानके कायदा’ पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरींवर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असल्याचे वास्तव रविवारी दुपारी ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशनमध्ये’ पुढे आले आहे.शहरात प्रत्येक पानटपरींवर राजरोजसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना एफडीए अधिकाऱ्यांचा आर्शिवाद तर नाही ना? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊनमध्ये पानटपऱ्या बंद होत्या तरीही छुप्या मार्गाने शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच होती. मात्र, अनलॉकमध्ये अनेक किरकोळ व्यावसायिकांनी परवानगी नसतानाही धाडस करून पानटपऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी, गुटख्याच्या घातक अशा पुड्या, सुगंधी तंबाखू, पानमसाला विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यवसाधीन होत असून त्यांना कर्करोगसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहेत. त्याकारणानेच शासनाने आठ वर्षापुर्वी राज्यात गुटखा बंदी आणली. तरीही मध्यप्रदेशातून शहरात गुटखा दाखल होतो. येथील गुटखा तस्करांकडून पानटपरींवर तो पोहचतो व शहरात प्रत्येक पानटपरींवर ‘मागेल त्यांना गुटखा’ मिळत असल्याचे ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तीन वेगवेळ्या चौकात जावून लोकमच्या चमुने १०० रुपयाचा गुटखा विकत घेतला.विशेष म्हणजे अमरावती मध्यवर्ती आगाराच्या बाजुला अन्न व औषधी प्रशासन विभाग (एफडीए)चे कार्यालय आहे. त्याच्या समोरच एका पानटपरीवर एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चवून अवैधरीत्या गुटखा विक्री होत असताना याकडे अधिकाºयांनी मात्र, या प्रकाराकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे.अधिकाऱ्यांची तोंडदेखली कारवाईराज्यात शासनाने गुटखा बंदी लागू केली. त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा त्याचे वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. अमरावतीत सह. आयुक्त व सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी कार्यरत असतानाही गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर त्यांचा धाक उरलेला नसल्याने या कायद्याची पायमल्ली होत आहे. फक्त शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अधिकारी काही ठिकाणी कारवाया करीत असल्याचे वास्तव आहे.पानटपरी सुरू करण्यास परवानगी नाहीलॉकडाऊनमध्ये पानटपरी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास प्रशासाने मनाई केली आहे. पानटपरीचालकांना अद्याप पानटपरी सुरू करण्यास परवानगी मिळाली नाही. तरही काही पानटपरी चालकांनी नियमांचे उल्लघंन करीत पानटपऱ्या उघडल्या आहेत, याकडे महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे दुर्लक्ष आहे.इतर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारी आणून एक स्वतंत्र कारवाई मोहीम राबविण्यात येईल. गुटखा विक्री करताना आढळून आल्यास कारवाई करू.- सुरेश अन्नपुरे, सह. आयुक्त एफडीए

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी