शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

घरोघरी नतमस्तक झाले गुरुदेवभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही गुरुदेवभक्तांचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. ‘श्रीगुरुदेव की जय हो“ असा घोष करीत टाळ-मृदंगाच्या गजरात, भगवी टोपी परिधान करून सर्वधर्म समभावाचे प्रतीक गुरुकुंजात शेकडो जण दाखल झाले.  

ठळक मुद्दे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव, शहीद जवान, कोविड योद्ध्यांनाही नमन, चाैकाचाैकात उत्साह

अमित कांडलकर    लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : मोजक्या साधकांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी ४.५८ वाजता गुरुकुंजात हृदयस्थ गुरुमाउलीला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी पर्वातील या महत्त्वाच्या सोहळ्याला  यंदा कोरोनामुळे गर्दी टाळण्यात आली. एकीकडे समाधीस्थळी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली वाहिली जात असताना, गुरुकुंज मोझरी गावात चौक, मोहल्ला आणि घरासमोरच्या मोकळ्या जागेत शेकडो गुरुदेवभक्त नतमस्तक झाले. कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही गुरुदेवभक्तांचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. ‘श्रीगुरुदेव की जय हो“ असा घोष करीत टाळ-मृदंगाच्या गजरात, भगवी टोपी परिधान करून सर्वधर्म समभावाचे प्रतीक गुरुकुंजात शेकडो जण दाखल झाले.  मुख्य कार्यक्रमाला ३.३० वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा’ या प्रार्थनागीताने सुरुवात झाली.

गुरुकुंज मोझरीत शिस्तबद्धतेचे प्रदर्शन

अमरावती : ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्ध रीतीने गुरुदेवभक्त, साधकांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने दोन्ही हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी ‘ऐ भारत के प्यारे भगवन। सुविचार से मुझको चलने दे। मनमंदिर के मेरे सारे। स्फूर्तिके रंग बदल दे।’ हे भजन व ‘चलाना हमें नाम गुरुका चलाना।’ व ‘राष्ट्रसंता जगतगुरु कृपावंता’ ही सामूहिक आरती करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, खिश्चन, पारशी या सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून झाल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला तसेच यावेळी भारतीय लष्करातील शहीद झालेल्या जवानांना व कोविड महामारीशी लढा देत असतांना मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्धांनासुद्धा यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले. संगीत संयोजन नरेंद्र कडवे यांनी केले. 

पहिल्यांदाच चुकला सोहळाकोरोनाकाळात अनेकांचा यंदा पहिल्यांदा मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा सोहळा चुकला. प्रशासकीय आदेशामुळे अनेक ग्रामस्थांनीच महासमाधी परिसराचे दुरून दर्शन घेऊन धन्यता मानली. गुरुदेवनगर व मोझरीवासीयांना राज्यभरातून येणारे भाविक व पालख्यांचे आदरातिथ्य करता आले नाही. राष्ट्रसंतांच्या विचारांवर आधारीत विविध आकर्षक देखाव्यांची निर्मिती करता आली नाही. गुरुकुंजात येऊ न शकल्याने लाखो गुरुदेवभक्तांनी घरीच राहून गुरुमाउलीला श्रद्धांजली अर्पण केली.

 

टॅग्स :Gurukunj Mozariगुरुकुंज मोझरी