शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

बारूद गँगने सिनेस्टाईल केला पाठलाग

By admin | Updated: August 21, 2015 00:39 IST

अमितचे हत्याकांड घडवून आणण्यापूर्वी बारूद गँगने अचलपुरात मोहन यांचा सीनेमातील खलनायकाने घ्यावा तसा शोध घेतला होता.

नागरिक होऊ लागले जागरूक : परराज्यातही अवैध व्यवसायाचे अड्डे अमरावती/अचलपूर : अमितचे हत्याकांड घडवून आणण्यापूर्वी बारूद गँगने अचलपुरात मोहन यांचा सीनेमातील खलनायकाने घ्यावा तसा शोध घेतला होता. बारुद्ध गँगची ही शोधाशोध ज्यांनी बघितली त्यांना ती अक्षरश: हिंदी चित्रपटातील गँग भासत होती. जो मोहनचा पत्ता देत नव्हता त्याला मारहाण करण्यात येत होती. एका धोत्रे नामक व्यक्तीने धाडस दाखवून सरमसपुरा पोलीस ठाण्यात या गँगच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार ७ जणांविरूद्ध दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारूद गँगचे फक्त अचलपुरातच नव्हे, तर तालुक्याबाहेरही अवैध व्यवसाय होते. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर मुक्तागिरीनंतर असलेल्या पल्लासखेडी गावात त्यांचा मोठा जुगार अड्डा चालत असे. जुगाऱ्यांना ने-आण करण्यासाठी चारचाकीअमरावती/अचलपूर : त्यात बारूद गँगचे रम्मू, जम्मू, बादशा यांचेसह शिरभाते, बब्बूभैय्या, जयनार आदी २२ जण पार्टनर होते. ते सर्व मिळून हा अड्डा चालवत असत. यात ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असे या उलाढालीत १ लाखांपेक्षा अधिक रकमेची मिळकत रोज होत होती. नंतर ते आपसात वाटून घेतले जात होते. या अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्यांची चहा-पाण्यापासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था केली जात होती. जुगाऱ्यांना बाहेरगावहून ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनाचीही व्यवस्था होती. परतवाडा येथील गुजरी चौकातून या गाड्या येत असून त्यासाठी काही गुप्त एजंट ठेवलेले होते. ते सावजाला हेरून गाडीत बसवून पल्लासखेडीला रवाना करीत होते. जुगारअड्डा प्रभावित झाला असला तरी तो पूर्णपणे बंद झालेला नाही.लोकमत अंकाचे सामूहिक वाचनबारूद गँगच्या दहशतवादाविरूद्ध ‘लोकमत’ने निर्भीडपणे उघडलेल्या मोहिमेबद्दल अध्यापक संजय चोबे, नगरसेवक अभय माथने, नगरसेवक नितीन डकरे, नगरसेवक संजय भोंडे, अध्यापक संजय सुरजुसे, गजेंद्र ढवळे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र फिसके, ओमप्रकाश दीक्षित, अनिल तायडे, अभिजित सरोदे, संजय टांक, राजा पिंजरकर, सागर यावले, विनायक खेडकर, नितीन भुयार, सतीश आकोलकर, भोला चव्हाण, सुहास दातीर, नितीन कुळकर्णी, अमोल गोहाड, प्रितेश अवघड, उत्तम साखरे (प्रहार), योगेश चांदणे यांचेसह आदींनी अभिनंदन केले असून ‘लोकमत’चे सामूहिक वाचन सुरू आहे. गाड्यांवर आरडीएक्स अंकितअचलपूर-परतवाड्यातील काही दुचाकी, तीनचाकी (आॅटो) व चारचाकी गाड्यांवर आरडीएक्स असे लिहिले आहेत. या गाड्यांचे मालक किंवा चालक या बारूद गँगचे सदस्य असल्याचा लोकांचा संशय आहे. पोलिसांनी आरडीएक्स लिहिलेल्या गाड्यांचा शोध घेऊन यासंदर्भात खुलासा करावा, अशी जनतेची मागणी आहे.