Amravati : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्रपणे कृषी नियोजन करा; पालकमंत्र्यांंचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 11:59 AM2022-05-19T11:59:18+5:302022-05-19T12:02:26+5:30

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२२ नियोजन सभा नियोजन भवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

Guardian Minister yashomati thakur instruction to do separate agricultural planning for the saline belt | Amravati : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्रपणे कृषी नियोजन करा; पालकमंत्र्यांंचे निर्देश

Amravati : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्रपणे कृषी नियोजन करा; पालकमंत्र्यांंचे निर्देश

googlenewsNext

अमरावती : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे १ लाख ६० हजार २०६ हेक्टर एवढे भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्राची जमीन, सिंचन पद्धती व इतर वैशिष्ट्ये लक्षात घेता कृषी योजनांची अधिक परिणामकारकता साधण्यासाठी खारपाणपट्ट्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी येथे दिले.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२२ नियोजन सभा नियोजन भवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, सर्व तालुका कृषी अधिकारी, विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते. खारपाणपट्ट्यात जिल्ह्यातील मोठे क्षेत्र व तेथील वैशिष्ट्ये लक्षात घेऊन पुढील वर्षापासून स्वतंत्र नियोजन करावे. खारपाणपट्ट्याबाबत २०१४ मध्ये स्वतंत्र प्रस्ताव केला होता. तो तपासून आवश्यक त्या नव्या नोंदीसह सादर करावा. खारपाणपट्ट्यासाठी संरक्षित सिंचन निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेततळे मोहीम व्यापकपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

समित्या कार्यान्वित करा

जिल्ह्यात कृषी विकास समित्या, तसेच ‘पोकरा’अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या कार्यान्वित कराव्यात. सदस्यांचे प्रशिक्षण घ्यावे. ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक यांनी समन्वयाने आठवड्यातून एक दिवस शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणींचे निराकरण केले पाहिजे. हा उपक्रम नियमितपणे राबवावा. पीक कर्ज वितरणाला गती द्यावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होऊ नये. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

पीक विम्याचा आढावा

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत प्रकरणे प्रलंबित राहण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शासनाकडून शेतकरी बांधवांच्या हितासाठी योजना राबविण्यात येतात. त्यामुळे त्यांची अडवणूक होता कामा नये. नियुक्त कंपनीने कामात सुधारणा न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. बोगस बियाणे, तसेच बियाणे, खते यांची चढ्या दराने विक्री, साठेबाजी अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथके सर्वदूर नियुक्त करावीत व कठोर नियंत्रण निर्माण करावे. कुठेही गैरप्रकार घडू नये. महिला किसान दिवस, रानभाजी महोत्सव असे उपक्रम केवळ एका दिवसापुरते साजरे न करता त्यात सातत्य राखावे व ते तालुकास्तरावरही घ्यावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

Web Title: Guardian Minister yashomati thakur instruction to do separate agricultural planning for the saline belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.