शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसीतील निधीवरून पालकमंत्री-आमदारांत जुंपली, काँग्रेस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:42 IST

अमरावती : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे.

अमरावती : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेतला आहे.दरम्यान, दीड महिना उलटूनही तो निधी मिळाला नसल्याने महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये धुसफूस वाढली आहे. डीपीसीतील निधीवर आमचाही हक्क असल्याचे सांगत दोन्ही स्थानिक आमदारांनी या निधी वितरणात अडसर निर्माण केल्याचा आरोप महापालिकेत विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसी सदस्यांनी केला आहे.पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी महापालिकेला दिलेल्या ७.३६ कोटी रुपयांच्या निधीतून नगरसेवकांना पैसे केव्हा देता, अशी विचारणा बुधवारी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांच्यासह सत्तापक्षाचे नेते सुनील काळे यांनी आयुक्त हेमंत पवार यांना केली. विशेष म्हणजे, या निधीतून प्रत्येकी आठ लाख रुपये येतील, असे मानून बांधकाम विभागाने नगरसेवकांकडून कामाची यादी मागितली. अंदाजपत्रकही बनवून तयार झाले. मात्र, जिल्हाधिकारी स्तरावर दोन्ही आमदारांनी डीपीसीच्या निधीवर आक्षेप घेतल्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली नाही.जिल्हा नियोजन समितीचे पालकत्व अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांकडे असले तरी आमदारसुद्धा डीपीसीचे सदस्य आहेत. त्यामुळे नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये निधी देताना डीपीसीने आमदारांनाही विश्वासात घेणे अगत्याचे होते. तथापि, तसे न झाल्याने मूलभूतप्रमाणे डीपीसीचा हा निधीही राजकारणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्चमध्ये सत्तेत आल्यानंतर आणि नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही नगरसेवकाला एक रुपयाही मिळालेला नाही.मी महाराष्ट्राचा वित्त व नियोजन मंत्री राहिलो आहे. डीपीसी ही कायद्यानुसार बनली आहे. केवळ मनपा नगरसेवकांना निधी देणे ही बाब असंवैधानिक आहे. डीपीसीच्या अध्यक्ष वा सदस्यांना तसे अधिकार नाहीत. निधी वितरण हा डीपीसीचा संयुक्त अधिकार आहे.- सुनील देशमुख,आमदार, अमरावतीराणा नॉट रिचेबल; पालकमंत्री बैठकीतनिधी वितरणावरून उद्भवलेल्या घटनाक्रमावर आ. रवी राणा यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पालकमंत्री प्रवीण पोटे हे गुरुवारी दिवसभर बैठकीत व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Pravin Poteप्रवीण पोटेAmravatiअमरावती