शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अतिखोल जलधारातून उपस्यामुळे भूजलात घट; ‘जीएसडीए’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 20:46 IST

राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे.

अमरावती : राज्यातील बहुतेक भागात ६० मीटरपेक्षा अधिक अतिखोल विंधन विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात आहे. काही भागांत १००० ते १२०० फुटांपर्यंत खोलीच्या विहिरी सिंचनासाठी कार्यरत आहेत. भूजल व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून २०० फुटांपेक्षा अधिक खोलपर्यंत होणारा पाण्याचा उपसा पुनर्भरीत होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. भूजलात कमी येण्याचे हे एक महत्वपुर्ण कारण असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण (जीएसडीए) च्या अहवालात नोंदविले आहे.

राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे. यामध्ये पाणी साठवण क्षमता ही अत्यंत कमी म्हणजेच १ ते ३ टक्केच आहे. राज्याचा १० टक्के भूभाग हा कठीण अशा रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येदेखील पाणी साठवणीचे हेच प्रमाण आहे. उर्वरित ८ टक्के भाग हा खडकांनी व गाळाने व्यापला आहे. याच स्थरात ५ ते १० टक्कयांपर्यंत पाण्याची उपलब्धता आहे. भौगोलिक संरचनेचा विचार करता २८ टक्के भूभाग हा डोंगरमाथ्याचा व उताराचा आहे. याच प्रदेशात अधिक प्रमाणात जल अपधाव होत आहे. मात्र, भूजल उपलब्धता त्यामानाने कमी आहे. राज्यात एकूण ४४ टक्के भूभाग हा पठारी आहे. या भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे आहे. या व्यतिरिक्त २८ टक्के भूभाग हा नद्याखोºयांचा सपाट प्रदेश आहे. त्यामुळे भूजलाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत आहे.भूजलात कमी येण्याची कारणे

सूक्ष्म सिंचनावरचे क्षेत्र अद्यापही मर्यादेत असल्यामुळे तसेच पारंपरिक पिकांसठी १०० टक्के सूक्ष्म सिंचन व्यवस्था अस्तित्वात न आल्यामुळे बºयाच भागात प्रवाही पद्धतीने सिंचन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. बहुवार्षिक पिकांकरिता भूजलाचा अधिक उपसा होत आहे. पावसाचा खंड पडल्यास किंचा पर्जन्यमान कमी असल्यास शेतकरी खरीप पिकांसाठी अधिक भूजलाचा उपसा करून संरक्षित सिंचन करतात. त्यामुळे ज्यावेळी भूजलाचे पुनर्भरण होणे महत्त्वाचे असते, नेमके त्याचवेळी भूजलाचा उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमी येत असल्याचे निरीक्षण जीएसडीए विभागाने नोंदविले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती