शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
3
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
4
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
5
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
6
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
7
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
8
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
9
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
10
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
11
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
12
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
13
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
14
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
16
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
17
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
18
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
19
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
20
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव

मोबाईल गेमच्या नादात आजोबांच्या पैशावर नातवाचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

अमरावती : मोबाईलवरून ऑनलाईन गेम खेळताना वेगवेगळे इक्विपमेंट विकत घेत आपली रँक वाढविण्यासाठी एका नातवाने आजोबांच्या खात्यातून एक-दोन नव्हे ...

अमरावती : मोबाईलवरून ऑनलाईन गेम खेळताना वेगवेगळे इक्विपमेंट विकत घेत आपली रँक वाढविण्यासाठी एका नातवाने आजोबांच्या खात्यातून एक-दोन नव्हे तर चक्क एक लाख ८४ हजार रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा सर्वव्यापी झाला आहे. कुठलेही तंत्रज्ञान वापरताना त्याची जोखीमही माहीत असणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी मुलांना स्वतंत्र मोबाईल दिले आहेत. मात्र, मोबाईल व इंटरनेटच्या महाजालात अनेक चुकीच्या गोष्टीही दडलेल्या आहेत. त्यातील एक मोबाईलवरील गेम्स ही आहे. आज अनेक मुलांना या गेम्सने पछाडले असून, पालकांना याची भनकही असते. वरील घडलेल्या घटनेतून मुले गेम्सच्या नादात घरातच चोरी करायला लागले, हे स्पष्ट होते. वरूड तालुक्यात घडलेल्या या घटनेत नातवाने आपल्या आजोबांच्या खात्यावरच १ लाख ८४ हजार ९३ रुपयांचा डल्ला मारला. गेम खेळत असताना आपली रँक वाढविण्यासाठी त्याने आजोबांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल वापरून ही रक्कम संबंधिताच्या खात्यात ट्रान्सफर केली. ही बाब लक्षात येताच आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठले. तपासाची चक्रे फिरविण्यात आली. अखेर नातवानेच ही रक्कम वळती केल्याचे निष्पन्न झाले.

उच्चभ्रू कुटुंबातील पालक त्यांच्या ई-वॅलेटमधून पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारी घेऊन सायबर सेलमध्ये पोहोचतात. आतापर्यंत असे अनेक प्रकार उघड झाले. मात्र, मुलाच्या बाबतीत भविष्याचा विचार करून पालकांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. सुरुवातीला मजेशीर वाटणारे खेळ कसे घातक वळण घेतात, याचे हे उदाहरण आहे. फ्री-फायर, पब्जी यासारख्या ओपन वाॅर गेम्समध्ये मुले गुरफटत जातात. ऑनलाईन क्लास संपल्यानंतर मित्रांना ऑनलाईन बोलावून हा गेम खेळला जातो. सुरुवातीला सिस्टीमसोबत गेम खेळून पुढच्या पायरीवर ऑनलाईन खेळ सुरू होतो. येथे मग स्पर्धा लागते, ती शस्त्र खरेदीची. युद्धाचा विचार डोक्यात इतका भिनला जातो की, मुले आई-वडील व कुटुंबापासून अनाहूतपणे दूर जातात. हा प्रकार सहज पालकांच्या लक्षात येत नाही.

मुलांनी मोबाईलचा मर्यादित वापर करावा, पालकांनी मुलाला मोबाईल देताना त्यातील काही फिचरचा वापर करता येतो. शक्य झाल्यास मुलांना घरात काॅम्प्युटर देऊन त्यावर ऑनलाईन क्लासेसपुरतेच इंटरनेट द्यावे. पालकांनी मोबाईलचा वापर हा जबाबदारीने करणे गरजेचे आहे. सर्च हिस्ट्रीमध्ये मोबाईलवर काय पाहण्यात आले, हे दिसते. मुले पालकांचा मोबाईल सहज हातात घेतात. किशोरवयात असलेल्या मुलांची अनावश्यक बाबींवर नजर पडते. त्यामुळे मुलांच्या अगोदर पालकांनी स्वत:ला शिस्त घालणे आवश्यक झाले आहे.

- मुलांमध्ये पेरलं जातंय गुन्हेगारीचं बीज. मोबाईल गेम्सचे व्यसन जडल्याने मुले बंडखोर होत आहेत.

- मुलाला एखाद्या दिवशी मोबाईलवर गेम खेळायला मिळाला नाही तर त्याची चिडचिड होते.

- मुलांची भूक मंदावल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. यामागे मोबाईलचे व्यसन हे एक महत्त्वाचे कारण आहे.

- मोबाईल वापराची शिस्त पालकाने स्वत: घालून घेणे गरजेचे आहे. त्यांचे अनुकरण मुले करतात.

अशी घ्या खबरदारी

- मोबाईलमध्ये पॅरेन्टल मोड ही सेटिंग आहे. त्या माध्यमातून ॲप्सच्या वापरावर निर्बंध घालता येतात. प्रत्येक ॲपला पासवर्ड टाकता येतो, जेणेकरून मुलगा ऑनलाईन क्लास करताना पालकांची नजर चुकवून इतर कोणतीही गोष्टी वापरू शकत नाही. याशिवाय इंटरनेट डेटा लिमिट ऑप्शन ऑन करून ठेवावे. नेट संपल्यानंतर काही करता येत नाही.