ग्रामविकासकडे निधी प्रलंबित : चार वर्षांत १,३१० निवडणुकागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात सन २०१०-११ ते २०१३-१४ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या ८३१ सार्वत्रिक व ४६९ पोटनिवडणुका अशा एकूण एक हजार ३१० निवडणूक पार पडल्यात. यासाठी महसूल यंत्रणेला २ कोटी ६७ लाख ९५ हजार ४३८ रूपयांचा खर्च आला. यापैकी १ कोटी ३५ लाख ५० हजार १८९ लाखांचा निधी ग्रामविकासने दिला आहे. या चार वर्षांतील प्रलंबित असलेल्या १ कोटी ३२ लाख ४५ हजार २४७ हजार रुपयांच्या उधारीवर निवडणूक घेण्याची नामुष्की महसूल विभागावर आली आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १८ सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका २७ जुलै रोजी होणार आहेत. २७४ ग्रा.पं. पोटनिवडणुका २७ जुलै रोजी होणार आहेत. २७४ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होती यामध्ये अंतिम मुदतीपर्यंत ५७ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. ६४ सदस्य पदे अविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात १५३ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा निवडणूक यंत्रणेला २४ जून रोजी १२ लाख ९० हजार दिलेत.जून महिन्यांत चार कोटींचा निधीआॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यातील ११ जिल्ह्यात होत असलेल्या १ हजार ७७९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ६३२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने ३ कोटी ५८ लाख ४७ हजार ९२८ रुपयांचे अनुदान २४ जून २०१५ रोजी उपलब्ध केले. यामध्ये अमरावती जिल्ह्याला १२ लाख ९० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. प्रलंबित निधीसाठी अमरावतीसह पाच जिल्ह्यांना ठेंगाग्रामविकास विभागाने यापूर्वीचा प्रलंबित निधी ५ जिल्ह्याला ६० लाख ५२ हजार ७२ रुपये सांगली, कोल्हापूर, बीड, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याला यापूर्वी दिलेत. यामध्ये मात्र अमरावती, यवतमाळ, वर्धा, लातूर व नांदेड जिल्ह्याला वगळण्यात आले आहे.
१ कोटी ३२ लाखांच्या उधारीवर ग्रा.पं. निवडणुकांची नामुष्की
By admin | Updated: July 19, 2015 00:03 IST