आठ महिन्यांनंतर ग्रामपंचायतींत होणार ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:38+5:302021-01-17T04:12:38+5:30

अमरावती : काेरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार ...

Gram Sabha will be held in Gram Panchayat after eight months | आठ महिन्यांनंतर ग्रामपंचायतींत होणार ग्रामसभा

आठ महिन्यांनंतर ग्रामपंचायतींत होणार ग्रामसभा

Next

अमरावती : काेरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार गत मे महिन्यापासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभाही स्थगित करण्यात आल्या होत्या. अशातच आता १५ जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामसभावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतींमध्ये येत्या २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होणार आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३)च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. अशातच कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासनादेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभांवर बंदी घालण्यात आली होती. सदर आदेश व कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेत असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रादुर्भावाच्या दृष्ट्रीने योग्य नाही नसल्याची बाब विचारात घेऊन शासनाने ग्रामसभा घेण्यास तात्पुर्ती स्थगिती दिली होती. सध्याच्या स्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांत शिथिलता येत असून बहूतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास दिलेली स्थगिती उठविण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती. त्यानुसार आता कोविडच्या लॉकडाऊनमधील स्थिती पूर्वपदावर येत असल्याने ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ग्रामसभा घेताना फिजिकल डिस्टन्स, तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे कोटकोर पालन करून ग्रामसभांना परवानगी देण्यात आल्याने आता पूर्वीप्रमाणेच ग्रामसभा पार पडणार आहेत.

बॉक़्स

प्रजाकसत्ताक दिनी ग्रामसभा

गत मे महिन्यापासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली होती.यामुळे १ मे रोजी होणारी ग्रामसभा,१५ ऑगस्ट रोजीची तसेच नोव्हेबर महिन्यातील व अन्य विशेष ग्रामसभा कोरोनामुळे होवू शकल्या नाहीत.त्यामुळे आता ग्रामविकास विभागाने १५ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशामुळे येत्या २६ जानेवारी म्हणजेच प्रजाकसत्ताक दिनी जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Gram Sabha will be held in Gram Panchayat after eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.