शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

बिबट्याची दहशत कायम ग्रामपंचायतीने केला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे सात दिवसांपासून कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे. रात्रीत ओलित करण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली आहे. दिवसभर बिबट्याच्या दहशतीमुळे महिला मजूर शेतात जात नाहीत. या भागात वनविभागाने सोमवारी दोन कॅमेरे लावले आहेत.

ठळक मुद्देशेतीची कामे ठप्प : शेंदूरजना येथे वनविभागाने लावले ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : सात दिवसांपासून तालुक्यातील गव्हा फरकाडे, शेंदूरजना खुर्द पंचक्रोशीतील अनेकांना दृष्टीस पडलेला बिबट सोमवारीसुद्धा दिसून आल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प झाली आहे. दरम्यान या या बिबट्याला जेरबंद करण्याचा ठराव शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने सोमवारी घेतला. जंगल परिसरात वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे सात दिवसांपासून कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे. रात्रीत ओलित करण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली आहे. दिवसभर बिबट्याच्या दहशतीमुळे महिला मजूर शेतात जात नाहीत. या भागात वनविभागाने सोमवारी दोन कॅमेरे लावले आहेत. मोती कोळसा नदीच्या परिसरात बिबट दररोज आढळत असल्याने या भागात सतर्कतेचे आदेश वनविभागाने दिले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने मासिक सभा घेऊन या बिबट्याला जेरबंद करावा, अशा मागणीचा ठराव घेऊन वनविभागाला पाठविला आहे. कामनापूर येथून शेंदूरजनाखुर्द येथील शाळेत येणारे अनेक विद्यार्थी सोमवारी आले नाहीत. गत आठवड्यात वनविभागाला बिबट्याचे ठसे मिळाले आहे.शेतात जातांना मजुरांनी चार ते पाचच्या संख्येने शेतात जावे. घाबरण्याचे काही कारण नाही. वन विभागाने चार वनरक्षकांची गस्त त्या भागात लावली आहे.- आशिष कोकाटे,वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदुर रेल्वेसात दिवसांपासून गाव परिसरात बिबट्याची दहशत आहे. वनविभागाने तातडीने कारवाई करून त्या बिबट्याला जेरबंद करावे. तसा ठरावच सोमवारी स्थानिक ग्रामपंचायतने मंजूर केला.- अजय देशमुख, उपसरपंच, शेंदूरजना खुर्द