ब्राह्मणवाडा थडी : स्थानिक ग्रामपंचायतीतील विरोध गटातील सदस्यांना न कळविता ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. वारंवार अपमान केला केल्याचा सूर त्यांनी ग्रामसचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दिलेल्या तक्रारीत लावला आहे. सत्ताधारी हुकूमशाही पद्धतीने कामकाज करीत असल्याबाबतही नाराजी विरोधकांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीचे सचिव विरोधी पक्षाचे सदस्यांना विश्वासात न घेता सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार काम करीत आहेत. विरोधी पक्षाचे काही समस्या असल्यास त्यांना डावलले जात आहे. बाबूभाई इनामदार, मुरलीधर ठाकरे मोहम्मद आमिर, रुपाली अविनाश काळे, पद्मा संजय मेसकर, सुनीता विनोद अमृते, अरुणा सुरेश बोरवार, जोहराबी शे. ईसा हे ग्रामपंचायतीत विरोधी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांच्या वॉर्डाचे काही काम सांगितल्यास सचिव निधी उपलब्ध नसल्याचे सांगतात. राष्ट्रीय सणाच्या नियोजनासाठी बैठक न बोलावता १५ ऑगस्टनिमित्त दरवर्षीप्रमाणे दोन दिवसाअगोदर नियोजन करण्यासाठी सर्व सदस्यांची बैठक घेऊन नियोजन केले जाते. परंतु, यावर्षी सचिव कुठलीही मीटिंग न घेता ध्वजारोहण सोहळा घेण्यात आला. विरोधी सदस्यांना अपमानजनक वागणूक देऊन राष्ट्रीय महापुरुषांना हारार्पणासाठी संधी दिली नाही. विरोधी पक्षातील कोणतेही सदस्याचे नाव घेतले गेले नाही.
सत्ताधारी पक्षाचे सदस्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम आटोपण्यात आला. मासिक सभेला निविदा रोस्टरच्या विषयावर आम्ही सर्व सदस्यांनी विरोध केला असता, सचिवांनी फक्त एकाच व्यक्तीचा विरोध आहे, असे ठरावात नमूद केला आहे. यामुळे मासिक सभेचा ठराव मंजूर नसल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले.