केंद्र शासनाला पार्सलद्वारे पाठविल्या गोवऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:12 AM2021-03-06T04:12:03+5:302021-03-06T04:12:03+5:30

चांदूर बाजार राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून गॅस दरवाढीचा निषेध आसेगाव पूर्णा : गॅस सिलिंडर दरवाढीवरून केंद्र शासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला ...

Gowaris sent to the Central Government by parcel | केंद्र शासनाला पार्सलद्वारे पाठविल्या गोवऱ्या

केंद्र शासनाला पार्सलद्वारे पाठविल्या गोवऱ्या

Next

चांदूर बाजार राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून गॅस दरवाढीचा निषेध

आसेगाव पूर्णा : गॅस सिलिंडर दरवाढीवरून केंद्र शासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या चांदूर बाजार ग्रामीण शाखेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टपालाद्वारे गाईच्या शेणाच्या गोवऱ्या पाठविण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारी महिन्यात सलग तीनवेळा गॅस सिलिंडरची दरवाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महिलांना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. मोदींच्या केंद्र सरकारला जनतेविषयी अजिबात सहानुभूती नाही. त्याच्या निषेधार्थ राज्यभर ‘मोदींच्या पेट्रोल पंपावरील बॅनरखाली चूल मांडा’ आंदोलन राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केले. अमरावती जिल्ह्यात संचारबंदी असल्याने आंदोलन न करता, महिला पदाधिकाऱ्यांनी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या पार्सल करून पंतप्रधानांना पाठवल्या. आंदोलनात तालुकाध्यक्ष आशा गोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका ग्रामीण सदस्य सुमित्रा गवई यांनी मार्गदर्शन केले.

फोटो कॅप्शन - पार्सलद्वारे गायीच्या शेणाची गौवरी पाठविताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आशाताई गोटे

Web Title: Gowaris sent to the Central Government by parcel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.