शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

Amol Mitkari: शिवजयंतीपूर्वीच सरकार कोसळणार, अमोल मिटकरींनी सांगितलं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 16:11 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार 14 फेब्रुवारी कोसळेल असा दावा केला.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, काल केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुनावणी झाली. आता, पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच, लवकरच हे सरकार कोसळणार असल्याच भाकीतही केलं जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी 14 फेब्रुवारी रोजी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर, आता आमदार अमोल मिटकरी यांनीही नवी डेडलाईन दिली आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार 14 फेब्रुवारी कोसळेल असा दावा केला. त्यानंतर, आता अमोल मिटकरींनीही नवी तारीख दिली आहे. सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले असून येत्या शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार आहे. सरकारमध्ये अस्वस्थता असल्याने  हे सरकार कोसळलेलं दिसणार. शिवजयंतीपूर्वीच शिंदे आणि फडणवीस सरकार कोसळणार असं भाकीत आमदार मिटकरी यांनी केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईत बी.एम.सी संदर्भात झाली असली तरी, बी.एम.सीवर भगवा शिवसेनेचा फडकणार. या सरकारचा कार्यकाळ फक्त 15 ते 20 दिवसांचा आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार हे जास्त दिवस राहणार नाही.  येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवड लागू शकते, असं मतही मिटकरी यांनी व्यक्त केलं. दरम्यान, 14 फेब्रुवारीपासून अपात्र आमदारांसंदर्भातील सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सरकारचं भवितव्य ठरणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. 

धनुष्यबाण चिन्हाबाबतही सुनावणी सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्हासाठीही दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीShivjayantiशिवजयंतीGovernmentसरकार