शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाहन लपविले, निवडणूक आयोगाच्या हातावर आरएफओंनी दिल्या तुरी

By गणेश वासनिक | Updated: April 8, 2024 21:32 IST

वन विभागाचा अफलातून कारभार, पोलिस मुख्यालयात कर्मचारी शोधताहेत वाहन

अमरावती: लोकसभा निवडणुकीकरिता मनुष्यबळ आणि शासकीय वाहनांची लागणारी गरज लक्षात घेता निवडणूक विभाग शासकीय विभागांचे वाहने अधिग्रहीत करण्यासाठी पुढे सरसावलेले असतानाच वनविभागातील एका वनाधिकाऱ्याने ताब्यातील शासकीय वाहन चक्क पतीच्या ताब्यात असलेल्या पोलिस मुख्यालयात लपविल्याचा अफलातून प्रकार पुढे आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कार्यासाठी शासकीय वाहने ताब्यात देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अमरावती जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना आदेश देवून शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्याच्या सक्त ताकीद दिलेली आहे. त्यानुसार अनेक विभागांचे शासकीय वाहने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहेत. याकामी प्रादेशिक परिवहन सक्तीने शासकीय वाहने ताब्यात घेण्यासाठी शासकीय कार्यालयांचा धांडोळा काढताहेत. मात्र, काही अधिकारी निवडणूक कामात शासकीय वाहने कसे वाचविता येईल, याकरिता नानाविध शकली लढवित असल्याची बाब पुढे आलेली आहे. मोर्शी येथे कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने चक्क त्यांच्या ताब्यात असलेले शासकीय वाहन पतीच्या पोलिस खात्याच्या मुख्यालयात थेट लपविलेले आहे.

मोटार विभागात लपविले वाहनेमोर्शी येथे कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल घुटे यांचे पती ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मोटार दुरुस्ती विभागात पोलिस निरीक्षक यापदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ग्रामीण पोलिसांची वाहने दुरुस्ती व देखभालीकरिता मुख्यालयात येतात. नादुरुस्त वाहनांचा विभाग असल्याने आणि या विभागाचे प्रमुख त्यांचे पती असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी शासकीय वाहन एम.एच. २७ ए.ए ०४९७ या क्रमांकाचे वाहन निवडणुकीच्या तगाद्यातूनन वाचविण्याकरिता थेट पोलिस मुख्यालयात नादुरुस्त वाहनांच्या रांगेत लपवून ठेवलेले आहे. जवळपास १२ दिवसांपासून शासकीय वाहन धुळखात पोलिस मुख्यालयात लपविले आहे, तर दुसरीकडे या संबंधित शासकीय वाहन निवडणुकीच्या कामात वापरण्याकरिता, जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवहन विभाग या वाहनाच्या शोध घेताना दिसून येत आहे. सुरक्षित ठिकाणी हे वाहन बंदीस्त आहे.निवडणूक विभागाने वाहनांची मागणी केली आहे. पण कायमस्वरूपी चालक नसल्याने वाहन देण्याचे टाळले. एम.एच.२७ ए.ए. ०४९७ क्रमांकाचे वाहन हे अगोदर विभागात होते नंतर अमरावती, भातकुली आता मोर्शी आरएफओंकडे देण्यात आले आहे.- शरद करे, विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग