शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाच्या वर्गीकरणावर राहणार शासकीय सचिव, बाजार समित्यांमध्ये नि:पक्ष कारभाराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 16:55 IST

बाजार समित्यांचे सचिव हे त्या बाजार समितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारीच असतात. मात्र, अनेक बाजार समित्यांमध्ये कनिष्ठ कर्मचा-यांना सचिवपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व नि:पक्षपाती कारभार होत नाही. आता बाजार समित्यांच्या उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

गजानन मोहोड अमरावती, दि. 8 - बाजार समित्यांचे सचिव हे त्या बाजार समितीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारीच असतात. मात्र, अनेक बाजार समित्यांमध्ये कनिष्ठ कर्मचा-यांना सचिवपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व नि:पक्षपाती कारभार होत नाही. आता बाजार समित्यांच्या उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार अधिक कार्यक्षमतेने व नि:पक्षपणे चालविण्यात सचिवांचा मोठा वाटा आहे. याबाबतीत पणन् अधिनियमाचे कलम ३५ (१) याअन्वये पणन् मंडळाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सचिवांचे पॅनल पूर्ण करावयाचे आहे व बाजार समित्यांद्वारा त्या पॅनलमधूनच सचिवांच्या नियुक्ती करावयाच्या आहेत. तथापि नियुक्तीबाबतचे आदेश न्यायप्रविष्ट असल्यामुळे बाजार समित्यांनी कनिष्ठ कर्मचा-यांना पदोन्नती देऊन कामकाज चालविले. त्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज पूर्ण क्षमतेने चालविणे अशक्य असल्याचे सहकार विभागाने ४ सप्टेंबरच्या आदेशाने स्पष्ट केले आहे.बाजार समितीचे सचिवपद हे एकलपद असल्याने ते आता सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे व उत्पन्नाच्या वर्गीकरणानुसार सहकार विभागातील विविध अधिका-यांची नियुक्ती करणे शक्य असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबतचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पणन् संचालक व पणन् विभागाच्या उपसचिवांना दिले आहेत. याच अनुषंगाने विविध अधिका-यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देखील तातडीने मागितला आहे. ३०७ पैकी २०१ बाजार समित्यांवरच नियमित सचिव- राज्यात ३०१ बाजार समित्या आहेत. यापैकी २०१ ठिकाणीच नियमित सचिव आहेत. ९८ बाजार समित्यांमध्ये प्रभारी सचिव व ८ बाजार समित्यांंमध्ये सचिव पदच रिक्त आहे.- वर्गवारीनुसार १ ते ५ कोटींच्या आतील बाजार समितीवर सहायक निबंधक दर्जाचे अधिकारी, ५ ते १० कोटींच्या बाजार समितीवर उपनिबंधक दर्जाचे, १०-२० कोटींच्या आतील ठिकाणी सहनिबंधक दर्जाचे व २० कोटींच्यावर  उत्पन्नाच्या ठिकाणी अपर निबंधक दर्जाचे अधिकारी देण्यात येणार आहेत.पणन् संचालकांनी बाजार समित्यांकडून मागविले ठरावबाजार समित्यांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे शासकीय अधिका-यांना प्रतिनियुक्ती देण्याचा ठराव पणन् संचालकांना सादर करण्याचे आदेश १४ आॅगस्टच्या पत्रान्वये दिले आहेत. शासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीने दिल्यास त्याअधिका-याचे वेतन, अनुषंगिक भत्ते बाजार समित्यांना अदा करावे लागणार आहे. त्यादृष्टीने बाजार समित्या सक्षम आहेत काय? याबाबतचा उल्लेख ठरावात करून जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.