शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

‘कोरोना’मुळे अनाथ झालेल्या बालकांना शासनसंरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही माता-पिता गमावले आहेत. त्यांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून ...

अमरावती : कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही माता-पिता गमावले आहेत. त्यांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्ह्यात कृती दल गठित करण्यात आला आहे. अशा बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने व कृती दलाने तातडीने जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार ‘कोविड १९’ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपानासाठी उपाययोजना व्हाव्यात म्हणून कृती दल गठित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकाचा फलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत बालगृहे, निरीक्षण गृहातील मुलांसाठी तात्काळ स्वतंत्र वैद्यकीय पथक गठित करावे. या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पोलीस दलाने सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार, तस्करीसारख्या गुन्हेगारीत सापडणार नाहीत याचीही दक्षता पोलीस दलाने घ्यावयाची आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

टास्क फोर्सची दर १५ दिवसांनी बैठक

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांस बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देत बालकाचा ताबा नातेवाइकांकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी जिल्हा बाल कल्याण समितीने करावी. कृती दलाची बैठक दर पंधरा दिवसांनी आयोजित करावी, अशाही सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी बालगृहांचा आढावा घेतला. अशा अनाथ झालेल्या बालकांचे जीवनमान सहज होण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ती कार्यवाही त्वरित करेल, असे नवाल यांनी सांगितले.

बॉक्स

चाईल्ड हेल्पलाईनवर संपर्क करावा

कोरोनामुळे दोन्ही पालकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्यास अशा पालकांच्या माहितीकरिता एक अतिरिक्त स्तंभाचा रिपोर्टमध्ये समावेश करण्यात यावा व या स्तंभामध्ये अशा पालकांच्या बालकांचा ताबा ज्या व्यक्तीकडे दिला आहे, त्याची माहिती भरण्यात यावी किंवा अशा बालकांचा ताबा घेण्यास कुणीही इच्छुक नसल्यास संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाने ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ व कृती दलाच्या समन्वयकास संपर्क साधावा, असे नवाल यांनी सांगितले.