शासन धनगर बांधवांच्या पाठीशी

By Admin | Updated: June 12, 2016 00:06 IST2016-06-12T00:06:46+5:302016-06-12T00:06:46+5:30

धनगर-धनगड एक आहे, असे म्हणणारा भाजपा हा एकमेव पक्ष असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे ...

Government backed Dhangar brothers | शासन धनगर बांधवांच्या पाठीशी

शासन धनगर बांधवांच्या पाठीशी

विकास महात्मे : समाजबांधवांच्या मागणीला वाव
तिवसा : धनगर-धनगड एक आहे, असे म्हणणारा भाजपा हा एकमेव पक्ष असून या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे व समाजबांधवांच्या या मागणीला न्याय देण्यासाठी अगदी जवळ पोहोचले असल्याचे खा. विकास महात्मे यांनी सांगितले.
६५ वर्षांनंतर राज्यसभेवर धनगर समाजाचा खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खा. विकास महात्मे हे नागपूर येथून अकोला येथे जात असताना त्यांचे तिवसा येथे भाजप कार्यकर्ते व धनगर बांधवांनी पुष्पहारांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित धनगर समाज बांधवांना ते संबोधित करीत होते. यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी एकजूट ठेवून काम करण्याचे आवाहन करून मला मिळालेल्या पदाचा मी ख?्या अथार्ने समाजसेवेकरिता उपयोग करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे तिवसा तालुकाध्यक्ष दिलीप नारिंगे, उपाध्यक्ष संजय चांडक, शहर अध्यक्ष रवी देशमुख, रामकृष्ण गावणार, पालीवाल, मुकुंद उदापूरे, नंदू गंधे, प्रशांत डहाके, संजय गोंडसे, दीपक गंधे, उत्तमराव गोंडसे, ज्ञानेश्वर थोटे, ज्ञानेश्वर पुनसे, धनजय कराळे, भोजराज गंधे, प्रशांत गोरडे,सुधीर गोंडसे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Government backed Dhangar brothers