शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागातील पोलिसांना दसऱ्यापूर्वी ‘गुड न्यूज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 19:29 IST

Amravati News नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रातील कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनाच्या दीडपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे.

ठळक मुद्देदीडपट वेतन अन् महागाई भत्ता मिळणारराज्याच्या गृह विभागाच्या निर्णय

अमरावती : नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रातील कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनाच्या दीडपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी हा निर्णय घेतला असून, दसऱ्यापूर्वी ही ‘गूड न्यूज’ ठरली आहे.

नक्षलग्रस्त अथवा अतिसंवेदनशील क्षेत्रात कर्तव्य बजावणे ही बाब मोठी जोखमेची आहे. प्रत्येक क्षणाला जीव मुठीत घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळावी लागते. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात कधी जीव गमवावा लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनात घसघशीत वाढ केली आहे. यात गडचिरोली, अहेरी नक्षलग्रस्त आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन, महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच या भागात कार्यरत

राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनाच्या दीडपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळेल, असे गृह विभागाचे सचिव संजय खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘त्या’ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना मिळणार लाभ

राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असतात. राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी कर्तव्य बजावलेल्या कालावधीतील वेतन, महागाई दीडपट देण्यात येणार आहे. मात्र, या भागात सामान्य प्रशासनाकडून नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना ही नियमावली लागू असणार नाही, असे शासनादेशात म्हटले आहे.

टॅग्स :Policeपोलिस